........आणि घोडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले खेळाचे मैदान
मैदान निर्मिती व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकला टच करा. https://youtu.be/HBVMzL2ewZ0
दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी गावातील अनुसूचित जमातीच्या मजूरी करणार्याची छोटीशी घोडेवाडी . घोडेवाडी गावात पासष्ट विद्यार्थी संख्या असलेल्या द्विशिक्षकी शाळेत वर्गखोल्या असल्या तरी मैदान मात्र उपलब्ध नव्हते. गावात गावठाणाची जागाही नाही. शाळेशेजारीच सात - आठ गुंठे उंचसखल पडिक जमीन . त्याच जमिनीवर बर्याच वर्षांपासून विहिरी साठी अर्धवटच खोदलेला खड्डा , गावातीलच ग्रामस्थांचे दोन तीन उकिरडे. शाळेतील विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण गावाच्या आरोग्यावर परिणाम करणारी अस्वच्छ , केरकचरा टाकायची हक्काची जागा. घोडेवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक विलास जमदाडे , आनंदराव गांगोडे यांनी ही बाब लक्षात घेऊन लोकवर्गणीतून घेतलेल्या लॅपटॉप उदघाटन कार्यक्रम प्रसंगी आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई मातेरे , उपसरपंच अशोक वडजे यांच्या कानावर घातली व हया जागेची लेव्हल करून विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करून द्यावे अशी मागणी केली.
जागेची पाहणी करून सरपंच, उपसरपंच यांनी तात्काळ ठेकेदाराला बोलावून घेतले. जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीस- पस्तीस हजार रुपये खर्च करून जागेची लेव्हल करण्यात आली व त्यानंतर 30 / 35 ट्रॅक्टर मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वागिण प्रगतीसाठी झटणाऱ्या येथील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेली मैदानाची उणीव आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दूर केली. विद्यार्थ्यांच्याही आनंदाला पारावर उरला नाही.
याकामी आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई मातेरे , उपसरपंच अशोककाका वडजे , सदस्य रमाकांत गांगुर्डे , मधुकर कडाळे , संजय वडजे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कडाळे , बाळासाहेब घोडे , अशोकराव घोडे , नरेंद्र खेताडे , महेंद्र घोडे , अर्जुन घोडे , सुनील घोडे आदिंचे अनमोल सहकार्य लाभले.
या स्तुत्य कामाबद्दल दिंडोरी पं. स.चे सदस्य अँड. विलास निरगुडे , जोपूळ बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. एन. निकम , केंद्रप्रमुख एस. एन. देवरे , राजेंद्र गांगुर्डे यांच्यासह पालकांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक आनंदराव गांगोडे , शिक्षक विलास जमदाडे , शोभा पाटील यांनी ग्रामपंचायतीचे ऋण व्यक्त करून आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा