दिंडोरी तालुक्यातील तंञस्नेही शिक्षकांची कार्यशाळा संपन्न
दिंडोरी तालुक्यातील तंञस्नेही शिक्षकांची १६ व १७ ऑक्टोबर २०१८ ह्या दोन दिवसीय कार्यशाळा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मानोरी तालुका- दिंडोरी येथे संपन्न झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पहिले.
विद्या प्राधिकरण, नाशिकचे अधिव्याख्याता भगवान खारके, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मिक चव्हाण, प्रशांत पगार, शेखर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तंञस्नेही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्र शाळेतील सहा विषयांसाठी प्रत्येकी दोन शिक्षक याप्रमाणे क्लस्टर रिसोर्स ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्याच ग्रुपमधील दिंडोरी तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण अडतीस तंञस्नेही शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.
उपस्थितांची ऑनलाईन हजेरी नोंदवून घेण्यात आली. राज्यस्तरावर कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंञस्नेही गुरू प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. विलास जमदाडे यांनी कार्यशाळेचे स्वरूप उद्दिष्ट यावर माहिती दिली. याप्रसंगी प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे, श्रावण भोये यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, ब्लॉग निर्मिती व डिझाईन, झूम मिटिंग, ई-ग्रंथालय, डिजिटल स्कूल, युट्यूब वरील व्हिडिओ डाऊनलोड करणे, मोबाईल स्क्रीन मिररिंग, पावर पाॅईट प्रेझेंटेशन, ऑनलाईन टेस्ट निर्मिती इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. सर्व प्रशिक्षणार्थींकडून वरील सर्व बाबींचे प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी श्रावण भोये यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यशाळेला दिंडोरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी एस. एस. घोलप, शिक्षण विस्तार अधिकारी सी. बी. गवळी, के. पी. सोनार, निलेश पाटोळे आदींसह तालुक्यातील केंद्रप्रमुख शरद कोठावदे, यजुर्वेद्र पागे, राजेंद्र गांगुर्डे, रामदास धाञक, दादासाहेब ठाकरे आदींसह सर्व केंद्रप्रमुखांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
फोटो :- दिंडोरी तालुकास्तरीय तंञस्नेही कार्यशाळेत रममाण झालेले शिक्षक.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा