वनारवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे ७२ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वनारवाडी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण प्रशासक व्ही. व्ही. शेवाळे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण पार्वता वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी व युवकांनी देशभक्तीपर विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली. ध्वजस्तंभाचे पूजन शरद भेरे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रशासक व्ही. व्ही. शेवाळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ या उपक्रमाची माहिती सांगितली. विलास जमदाडे यांनी प्ले स्टोअर वरून एस एस जी १८ ह्या अॅपच्या माध्यमातून प्रश्नावली भरून देण्याचे आवाहन करून प्लॅस्टिक मुक्त गाव तर आरोग्य सेवक सुनील महाले यांनी तंबाखू मुक्त गाव याविषयावर उपस्थित ग्रामस्थांकडून प्रतिज्ञा म्हणवून घेतली. शाळेच्या भौतिक गर्जाची पूर्तता करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे साडेपाच हजार रुपयांची देणगी शाळेला दिली. युवक मिञमंडळाने आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब नांदूरकर यांनी तर आभार सुनंदा घोलप यांनी मानले.
कार्यक्रमाला बंडूभाऊ भेरे, दत्तूभाऊ भेरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप घोलप, योगेश राऊत, भास्कर घोलप, शरद चव्हाण, गुलाबराव ठाकरे, अरूण चव्हाण, यादवराव डमाळे, संपत भेरे, भारत भेरे, नामदेव नाईकवाडे, योगेश घरत, मनिषा घोलप, कल्पना गुंबाडे, संगीता ससाणे, अंगणवाडी सेविका ललिता देशमुख, सुनीता बच्छाव आदींसह ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१ )फोटो:- जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे ध्वजारोहण करताना पार्वता वाघमारे समवेत शरद भेरे, भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा