इंग्रजी अल्फाबेट

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

वनारवाडी शाळेत महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
*वनारवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन*

 वनारवाडी (ता.दिंडोरी):- येथील जिल्हा परिषद शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती प्रतिमा पूजनासह परिसर साफसफाई करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलाबराव ठाकरे हे होते.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षक व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी केले होते. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली.
 विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक विलास जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त करून महात्मा गांधींचा 'स्वावलंबन' हा गुण अंगिकारावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदा घोलप यांनी महात्मा गांधींची आवडती प्रार्थना 'रघुपती राघव राजाराम' व 'दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल' या गीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे सूञसंचालन भाऊसाहेब नांदूरकर यांनी तर आभार प्रदर्शन विलास जमदाडे यांनी केले.



फोटो:- महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी गुलाबराव ठाकरे, भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप आदींसह शालेय विद्यार्थी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...