इंग्रजी अल्फाबेट

शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

एक काव्य - शाळा घडवंण काय असतं....

*शाळा घडवंण काय असतं....*

🏤🏛🏤🏛🏤🏛🏤🏛🏤

  *शाळा घडवंण काय असतं....*
*विरोधी प्रवाहाला आवरंण असतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....,*
*ओसाड जागेला खिळवणं असतं,*

  *शाळा घडवंण काय असतं....*
*विझणारी ज्ञानज्योत उजळंण असतं,*


  *शाळा घडवंण काय असतं....*
*समाजाला आपुलकीने जागवावं लागतं,*


  *शाळा घडवंण काय असतं....*
*चारभिंतींना बोलक करावं लागतं,*


  *शाळा घडवंण काय असतं....*
*बालमन आपलंस करत जोपासावं लागतं,*

व्हाट्स अँप कॉम्पुटरवर चालविण्यासाठी काय करावे ? !!🌎

🌎!! व्हाट्स अँप कॉम्पुटरवर चालविण्यासाठी काय करावे ? !!🌎

*# TECHNOEXAM UPDATE*

1. तुमच्या कॉम्पुटर वर इंटरनेट चालू असल्याची खात्री करा.
2. कॉम्पुटरवरील ब्राऊजर(इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स यापैकी कुठलेही) ओपन करा.
3. https://web.whatsapp.com/ हि लिंक ब्राऊजर मध्ये ओपन करा, यात एक बारकोड असलेले पेज ओपन होईल.
4. आता मोबाईलमधील व्हाट्सअप app उघडा
5. ऑप्शन्स मध्ये जाऊन WhatsApp Web वर टॅप करा.
6. बारकोड स्कॅनिंग साठी कॅमेरा चालू होईल.
7. कॉम्पुटर वरील ब्राऊजर मध्ये असलेला बारकोड स्कॅन करा
8. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे व्हाट्सअप ची मोबाईल प्रमाणे स्क्रीन कॉम्पुटर च्या ब्राऊजर वर दिसेल आणि तुम्ही कॉम्पुटर वर व्हाट्सअप वापरू शकता.

*MPSC च्या अपडेट्स साठी टेक्नोएक्झामचे WhatsApp चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा.*

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८

आदर्श व संगीतमय परिपाठ

असा असावा आदर्श परिपाठ


शालेय परिपाठ-


प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी ५-६ विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत. त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी सोपवावी. आठवड्यातील ६ वार वर्गवार विभागून द्यावेत.
उदा. सोमवार-५ वी
मंगळवार- ४ थी असे..
.
पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा. 

१.सावधान- विश्राम आदेश
संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.

२.राष्ट्रगीत
सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.

३.प्रतिज्ञा
आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.
(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.
उदा- ४ थी इंग्रजी, ५ वी -हिंदी, १ ली, २ री -मराठी)

४.भारताचे संविधान
परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.

५.प्रार्थना व श्लोक
ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.

६.पंचांग
केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.

७.सुविचार
सुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

८.दिनविशेषउगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही न काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे --- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

८.आजची म्हण व वाक्यप्रचार
म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो, म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.

९.बातमीपत्र
जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

१०.समूहगीत/देशभक्तीपर गीत
आठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.

११.बोधकथा
आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

१२.प्रश्नमंजुषा
आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)

१३.वैज्ञानिक दृष्टिकोन
समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)

१४.इंग्रजी शब्दार्थ 
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)

१५.दिनांक तो पाढे
गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)

१६. आजचे वाढदिवस
स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खिस असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---
वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.

१७.पसायदान
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.

१८.मौन
२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.

१९.विसर्जन
विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.

संकलन-श्री  विलास  जमदाडे .
**********************************************************
१) राष्ट्रगीत  संगीता शिवाय 

२) राष्ट्रगीत  संगीतासह 

३) प्रतिज्ञा  मराठी 

४)प्रतिज्ञा   हिंदी 

५) संविधान  संगीतमय 

६) पसायदान


************************************************************

संगीतमय प्रार्थना 

     १)"देह मंदिरचित्त मंदिरएकतेची प्रार्थना" 
                          डाउनलोड करण्यासाठी  मला क्लिक करा

  २)  "वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम्" 
                           डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा      

     ३) "तुम्ही हो मातापिता तुम्ही हो"
                           डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा 

 ४)"या भारतात बंधुभाव नित्य वसू दे"
                          डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा 

      ५) "इतनी शक्ती हमें देना दाता" 
                          डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा    

       ६) "सत्यम् शिवम् सुंदरम्" 
                       डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा             
                          
 ७) "असो तुला देवा माझा सदा नमस्कार"
                       डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा           

      ८) "सर्वात्मका शिवसुंदरा स्विकार या अभिवादना" 
                       डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा         

       ९)"खरा तो एकची धर्म" 
                       डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा           

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८


परिसर भेट 


कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून जि. प. शाळा वनारवाडी शाळेची परिसर क्षेत्र भेट विंद्यवासिनी देवी या ठिकाणी उत्साहात सपन्न झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना महाप्रसादाचा (खिचडी भात व बुंदी) भरपेट लाभ मिळाला. परतीच्या प्रवासात झाडाच्या सावलीत विद्यार्थ्यांनी गाणी, गोष्टी, नृत्य, नाट्यातून आपापले कलागुण सादर केले.निवडक क्षणचित्रे-- —

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

दिंडोरी तालुक्यातील तंञस्नेही शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

दिंडोरी तालुक्यातील तंञस्नेही शिक्षकांची कार्यशाळा संपन्न 



दिंडोरी तालुक्यातील तंञस्नेही शिक्षकांची कार्यशाळा संपन्न 

दिंडोरी तालुक्यातील तंञस्नेही शिक्षकांची १६ व १७ ऑक्टोबर २०१८ ह्या दोन दिवसीय कार्यशाळा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मानोरी तालुका- दिंडोरी येथे संपन्न झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पहिले.
      विद्या प्राधिकरण, नाशिकचे अधिव्याख्याता भगवान खारके, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मिक चव्हाण, प्रशांत पगार, शेखर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तंञस्नेही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  जिल्ह्यातील प्रत्येक केंद्र शाळेतील सहा विषयांसाठी प्रत्येकी दोन शिक्षक याप्रमाणे क्लस्टर रिसोर्स ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्याच ग्रुपमधील दिंडोरी तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण अडतीस तंञस्नेही शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. 
उपस्थितांची ऑनलाईन हजेरी नोंदवून घेण्यात आली. राज्यस्तरावर कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंञस्नेही गुरू प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. विलास जमदाडे यांनी कार्यशाळेचे स्वरूप उद्दिष्ट यावर माहिती दिली. याप्रसंगी प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे, श्रावण भोये यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, ब्लॉग निर्मिती व डिझाईन, झूम मिटिंग, ई-ग्रंथालय, डिजिटल स्कूल, युट्यूब वरील व्हिडिओ डाऊनलोड करणे, मोबाईल स्क्रीन मिररिंग, पावर पाॅईट प्रेझेंटेशन, ऑनलाईन टेस्ट निर्मिती इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. सर्व प्रशिक्षणार्थींकडून वरील सर्व बाबींचे प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी श्रावण भोये यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
   कार्यशाळेला दिंडोरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी एस. एस. घोलप, शिक्षण विस्तार अधिकारी सी. बी. गवळी, के. पी. सोनार, निलेश पाटोळे आदींसह तालुक्यातील केंद्रप्रमुख शरद कोठावदे, यजुर्वेद्र पागे, राजेंद्र गांगुर्डे, रामदास धाञक, दादासाहेब ठाकरे आदींसह सर्व केंद्रप्रमुखांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.


फोटो :- दिंडोरी तालुकास्तरीय तंञस्नेही कार्यशाळेत रममाण झालेले शिक्षक.



मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

........आणि शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले खेळाचे मैदान

........आणि घोडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले खेळाचे मैदान 

मैदान निर्मिती व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकला टच करा. https://youtu.be/HBVMzL2ewZ0

 दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी गावातील अनुसूचित जमातीच्या मजूरी करणार्‍याची छोटीशी घोडेवाडी . घोडेवाडी गावात पासष्ट विद्यार्थी संख्या असलेल्या द्विशिक्षकी शाळेत वर्गखोल्या असल्या तरी मैदान मात्र उपलब्ध नव्हते. गावात गावठाणाची जागाही नाही. शाळेशेजारीच सात - आठ गुंठे  उंचसखल पडिक जमीन . त्याच जमिनीवर बर्‍याच वर्षांपासून विहिरी साठी अर्धवटच खोदलेला खड्डा , गावातीलच ग्रामस्थांचे दोन तीन उकिरडे.  शाळेतील विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण गावाच्या आरोग्यावर परिणाम करणारी अस्वच्छ , केरकचरा टाकायची हक्काची जागा.  घोडेवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक विलास जमदाडे , आनंदराव गांगोडे यांनी ही बाब लक्षात घेऊन लोकवर्गणीतून घेतलेल्या लॅपटॉप उदघाटन कार्यक्रम प्रसंगी आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई मातेरे , उपसरपंच अशोक वडजे यांच्या कानावर घातली व हया जागेची लेव्हल करून विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करून द्यावे अशी मागणी केली. 
   जागेची पाहणी करून सरपंच, उपसरपंच यांनी तात्काळ ठेकेदाराला बोलावून घेतले. जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीस- पस्तीस हजार रुपये खर्च करून जागेची लेव्हल करण्यात आली व त्यानंतर 30 / 35 ट्रॅक्टर मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आले.
    विद्यार्थ्यांच्या सर्वागिण प्रगतीसाठी झटणाऱ्या येथील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेली मैदानाची उणीव आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दूर केली.  विद्यार्थ्यांच्याही आनंदाला पारावर उरला नाही.
    याकामी आंबेवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई मातेरे , उपसरपंच अशोककाका वडजे , सदस्य रमाकांत गांगुर्डे , मधुकर कडाळे , संजय वडजे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कडाळे , बाळासाहेब घोडे , अशोकराव घोडे , नरेंद्र खेताडे , महेंद्र घोडे , अर्जुन घोडे , सुनील घोडे आदिंचे अनमोल सहकार्य लाभले.
   या स्तुत्य कामाबद्दल दिंडोरी पं. स.चे सदस्य अँड.  विलास निरगुडे , जोपूळ बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. एन. निकम , केंद्रप्रमुख एस. एन. देवरे , राजेंद्र गांगुर्डे यांच्यासह पालकांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
       शाळेचे मुख्याध्यापक आनंदराव गांगोडे , शिक्षक विलास जमदाडे , शोभा पाटील यांनी ग्रामपंचायतीचे ऋण व्यक्त करून आभार मानले.

पालक मेळावा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी या शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश घोलप होते. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद भेरे, सदस्य गुलाब ठाकरे, शरद चव्हाण, यादवराव डमाळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती उपस्थित पालकांना दिली.
          उपशिक्षक विलास जमदाडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थी स्वच्छता, टापटिपपणा, विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच लोकसहभागातून शाळेला लॅपटॉप व म्युझिक सिस्टीम आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व उपस्थित पालकांनी लोकसहभागाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
        उपशिक्षिका सुनंदा घोलप यांनी विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास व त्याबाबत पालकांचे योगदान याविषयावर मार्गदर्शन करताना पालकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
         मेळावा प्रसंगी लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षांतील लाभार्थी विद्यार्थ्यांनींच्या उपस्थिती भत्त्याचे वाटप करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पालक विशेषतः माता पालकांची संख्या उल्लेखनीय होती.
          पालक मेळावा संपल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात पालकांनी पोषण आहारांतर्गत उसळ- भाताचा आस्वाद घेऊन आहाराबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जमदाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनंदा घोलप यांनी केले.
          कार्यक्रमाला भारत भेरे, वंदना चव्हाण, मनिषा घोलप, मंगला ससाणे आदींसह ग्रामस्थ, पालक, महिला व आजी माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

फोटो:- वनारवाडी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वितरण करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप घोलप, उपाध्यक्ष शरद भेरे, गुलाबराव ठाकरे, शरद चव्हाण, भाऊसाहेब नांदुरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप आदी...

स्वातंत्र्यदिन समारंभ

वनारवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे ७२ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वनारवाडी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण प्रशासक व्ही. व्ही. शेवाळे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण पार्वता वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. 
     प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी व युवकांनी देशभक्तीपर विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली. ध्वजस्तंभाचे पूजन शरद भेरे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रशासक व्ही. व्ही. शेवाळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ या उपक्रमाची माहिती सांगितली. विलास जमदाडे यांनी प्ले स्टोअर वरून एस एस जी १८ ह्या अॅपच्या माध्यमातून प्रश्नावली भरून देण्याचे आवाहन करून प्लॅस्टिक मुक्त गाव तर आरोग्य सेवक सुनील महाले यांनी तंबाखू मुक्त गाव याविषयावर उपस्थित ग्रामस्थांकडून प्रतिज्ञा म्हणवून घेतली. शाळेच्या भौतिक गर्जाची पूर्तता करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे साडेपाच हजार रुपयांची देणगी शाळेला दिली. युवक मिञमंडळाने आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब नांदूरकर यांनी तर आभार सुनंदा घोलप यांनी मानले. 
        कार्यक्रमाला बंडूभाऊ भेरे, दत्तूभाऊ भेरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप घोलप, योगेश राऊत, भास्कर घोलप, शरद चव्हाण, गुलाबराव ठाकरे, अरूण चव्हाण, यादवराव डमाळे, संपत भेरे, भारत भेरे, नामदेव नाईकवाडे, योगेश घरत, मनिषा घोलप, कल्पना गुंबाडे, संगीता ससाणे, अंगणवाडी सेविका ललिता देशमुख, सुनीता बच्छाव आदींसह ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


१ )फोटो:-  जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे ध्वजारोहण करताना पार्वता वाघमारे समवेत शरद भेरे, भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे.

पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविण्याची कार्यशाळा



जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे शाडू मूर्ती कार्यशाळा संपन्न 




दिंडोरी तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे मायको एम्प्लॉईज फोरम यांच्या वतीने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. 
मायको एम्प्लॉईज फोरमचे उपाध्यक्ष बी. ए. सोनवणे व सहसचिव जे. एन. पाटील यांनी मुर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बी. ए. सोनवणे यांनी पर्यावरण जागृतीचा संदेश आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिला. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेश मुर्ती बनविणे ही काळाची गरज झाली आहे. तसेच स्वतःच्या हाताने तयार केलेल्या मूर्तीचा आनंद काही औरच असतो. या विचारातून कार्यशाळा घेण्यात आल्याचे विलास जमदाडे यांनी सांगितले. कार्यशाळेच्या सुरूवातीला प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर यांनी केले तर आभार सुनंदा घोलप यांनी मानले.

फोटो:- वनारवाडी शाळेत गणेश मुर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी मायको एम्प्लॉईज फोरमचे उपाध्यक्ष बी. ए. सोनवणे, सहसचिव जे. एन. पाटील, समवेत भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप आदींसह शालेय विद्यार्थी.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी 
श्रमप्रतिष्ठा- मूल्यसंस्कार....
👇
जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी, ता.- दिंडोरी, जि.- नाशिक येथील शालेय विद्यार्थी फावल्या वेळात शालेय परिसर स्वच्छतेच्या कामी आवश्यक असणारा खराटा (झाडू) शालेय आवारातच असलेल्या नारळ सदृश्य शोच्या झाडांच्या झावळ्यांपासून (टाकाऊ पासून टिकाऊ) अगदी सहजतेने तयार करतात.
दरमहिन्याला कमीत कमी तीन / चार खराटे तयार होतातच. बाजारात एका खराटयाची किंमत ४० ते ५० रूपयांच्या दरम्यान असते. वर्षभरात लागणाऱ्या २५ ते ३० खराट्यांचे अंदाजे हजार ते बाराशे रुपयांची बचत शाळेची होतेय.
आमच्या वनारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे कर्तृत्व नक्कीच अभिमानास्पद .... 👌👌👌👍





गरीब ग्रामस्थांची श्रीमंत शाळा

लेखकाचे नाव:- श्री. विलास शिवाजीराव जमदाडे. 
शाळेचे नाव:- जि. प. प्राथ. शाळा घोडेवाडी, ता.- दिंडोरी, जिल्हा- नाशिक. 
ईमेल:- vilasjamdade123@gmail.com
वाॅटसअप नंबर:- ९८८१३०७५६३




गरीब ग्रामस्थांची श्रीमंत शाळा
           
             फार पूर्वी करंजी देवस्थान येथे कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्या ठिकाणी अनुसूचित जमातीचे लोक गाई-गुरे चारण्यासाठी परगावाहून येत असत. काही वर्षांनी त्यातील जुन्नर येथील लोकांनी हल्लीच्या ठिकाणी वास्तव्य केले. त्याच्या घोडे चारण्याच्या व्यवसायावरून या गावाला घोडेवाडी नाव पडले.
      दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी ग्रामपंचायतीची वाडी, स्वतंत्र महसुली गाव म्हणजे आमची घोडेवाडी. या गावातील बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, शेती अत्यल्प असल्याने बहुसंख्य लोक शेतमजूरी करतात. शिवाय कुक्कुटपालन व पशुपालनाचा जोडधंदाही करतात.
        अशा या ४०- ५० घरांची लोकवस्ती असलेल्या गावात स्वातंत्र्यानंतर २१ जून १९४९ रोजी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना झाली आहे. सन १९९६- १९९७ पर्यंत शाळा मारूती मंदिरात असलेल्या कोंदट खोल्यांमध्ये भरत होती. अत्यंत कमी गावठाण असलेल्या या गावात शासनाकडून अंगणवाडी शेजारीच दक्षिणोत्तर ३०×२० फूट  जागेत दोन वर्ग खोल्यांची इमारत बांधून मिळाली अन तेव्हापासून शाळेने मोकळा श्वास घ्यायला सुरूवात केली. कालांतराने पुढील पाचसहा  वर्षांत मुख्याध्यापक कार्यालय, स्वयंपाक खोली,  मुलां- मुलींसाठी स्वच्छता गृह शासकीय अनुदानातून बांधून मिळाले आहे.
            गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोलमजुरी करणारे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतांनाही वानवाच. आठवडाभर काबाडकष्ट करायचे आणि गुरूवारी वरखेडा या शेजारच्या गावातील आठवडे बाजारातून आवश्यक शिधा खरेदी करून पुढील आठवड्याची बेगमी करायची. महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने काबाडकष्ट करणाऱ्या. आणि अशा या घोडेवाडी गावातील द्विशिक्षकी शाळेत सन-२००७ साली माझी बदली झाली. अत्यंत निसर्गरम्य, आल्हाददायक वातावरण असलेल्या गोरगरिबांच्या शाळेच्या सर्वागीण विकासासाठी पुरेपूर योगदान देण्याचा निश्चय शाळेत हजर झाल्यापासूनच केला. अनेक नाविन्यपूर्ण छोटेमोठे उपक्रम राबवून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थांमध्ये शाळेविषयी आत्मियता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. "आम्ही शिक्षक म्हणजे चार दिवसांचे सोबती. शाळा तुमची आहे. तुमच्या हक्काच्या वस्तूंची जशी तुम्ही काळजी घेता तशीच काळजी या वास्तूंची घ्या. शाळेत गावाचे भविष्य निर्माण होत आहे. गावाचा विकास साधायचा असेल तर त्याची सुरुवात शाळेपासून करा." असे भावनिक आवाहन सातत्याने केले. 
        एकदा सकाळी सकाळी सुखदेव कडाळे हे ग्रामस्थ शाळेत आले. नेहमीप्रमाणे पारंपरिक तव्याच्या आकाराची लोखंडी प्लेट वाजवून शाळा भरल्याचा टोल वाजवला. ते बघून कडाळे दादा म्हणाले, "सर, ह्या घंटेचा आवाज लोखंड वाजवल्या सारखा येतो. मी आपल्या शाळेसाठी घंटा घेऊन देतो." तीन साडेतीन हजार रुपये खर्च करून २.५०० किग्रॅ वजनाची पितळेची घंटा त्यांनी शाळेला भेट म्हणून दिली. त्या घंटानादातून फक्त विद्यार्थीच जागृत झाले नाही तर आजपर्यंत अनेक ग्रामस्थांना शाळेविषयीच्या आपुलकीने जागृत केले.
        मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या संत सखुबाई, मीराबाई, वैष्णवी या बचत गटांनी शालेय पोषण आहार घेण्यासाठी पाच डझन डिश, धान्य साठवण्यासाठी कोठी शाळेला भेट दिली. 
    जिल्हा परिषदेच्या कोट्यातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक मिळण्याअगोदरच आमच्या गोरगरीब दानशूर ग्रामस्थांनी सन- २०१२ मध्येच प्रत्येक घरातून पाचशे रुपये असे एकूण ४२,०००/- रूपये जमा करून मुबलक व भक्कम लाकडी बाक खरेदी केले.
        शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी देखील शाळेच्या विकासात योगदान देण्याचा निश्चय केला. गुलाब घोडे यांनी ११,०००/- रूपये, तत्कालीन पंचायत समिती सदस्य अँड. विलास निरगुडे यांनी ७,०००/- रूपये, सुरेश सुकटे, प्रकाश घोडे, अरूण भारमल यांनी प्रत्येकी ५,०००/- रूपये, कैलास घोडे, दामोदर सुकटे यांनी प्रत्येकी ३०००/- रूपये, शाळेतील शिक्षक आनंदराव गांगोडे, शोभा पाटील, प्रल्हाद सोनवणे, विलास जमदाडे यांनी प्रत्येकी ५,०००/- याचप्रमाणे बहुसंख्य नोकरदार माजी विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीनुसार भरीव आर्थिक मदत करून शाळेला लॅपटॉप, शालेय आवार रंगरंगोटी, डिजिटल वर्ग खोली निर्मिती, प्रोजेक्टर, अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर यासाठी एकूण ९०,०००/- रूपये खर्च करून डिजिटल स्कूलच्या निर्मितीत भरीव योगदान दिले आहे.
         आमच्या गावाला गावठाणच (मोकळी पडिक जागा) नाही. त्यामुळे आमच्या शाळेच्या दोन वर्ग खोल्या व मुख्याध्यापक कार्यालयाच्या मध्ये असलेली १०×३० फुटाचा अल्पसा मोकळा परिसर हेच विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठीचे मैदान होते. शाळेच्या उत्तरेला तार कुंपणालगत ८-९ गुठ्ठयांची उंचसखल, गवत उगवलेली अस्वच्छ जागा होती. अनेक ग्रामस्थांनी येथेच उकीरडे तयार केले होते. संपूर्ण गावाची कचरा टाकण्याची हक्काची जागाच. ही जागा शाळेला लागूनच असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा ञास सहन करावा लागत होता. १५ ऑगस्ट २०१५ च्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानंतर आयोजित ग्रामसभेत ही अस्वच्छ, उंचसखल जागा लेव्हल करून शाळेला दिली तर अस्वच्छता दूर होऊन शाळेला छोटेसे मैदान तयार होईल. तसेच गावातील लग्नसमारंभ व इतर छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी एक हक्काची जागा तयार होईल याबाबत उपस्थितांचे उद्बोधन केले. शासकीय योजनेतून इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे बांधायला मुबलक जागा गावात उपलब्ध नसताना देखील ही जागा शाळेला मैदानासाठी देण्याचा दानशूर निर्णय ग्रामसभेतच येथील ग्रामस्थांनी मोठ्या मनाने घेतला. आंबेवणी गावाच्या तत्कालीन सरपंच शोभाताई मातेरे, उपसरपंच अशोककाका वडजे, सदस्य रामदास मातेरे व इतर सर्व सदस्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करून जेसीबी लावून ही अस्वच्छ, उंचसखल जागा लेव्हल करून दिली, ६०/७० ट्रॅक्टर मुरूम टाकून दिला. ग्रामसेवकांनी देखील ही जागा शाळेला दिल्याचा ठराव करून ६ ड चा तयार करून दिला. अशाप्रकारे ग्रामस्थांच्याच दातृत्वामुळे शाळेला हक्काचे मैदान उपलब्ध झाले.
        तसे आमचे गाव म्हणजे मुबलक पाण्याचे गाव. पावसाळ्याच्या दिवसात भूगर्भात अवघ्या सात आठ फुटावर पाणी लागेल अशी स्थिती असतानाही आमच्या शाळेतील विद्यार्थी बाराही महिने स्टीलच्या पंचपाञीत सकाळी भरून ठेवलेले ७०- ७५ लीटर पाणी दिवसभर पिऊन आपली तृष्णा भागवत. शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी असावी अशी दुर्दम्य इच्छा आम्हा शिक्षकांना होती. त्यासाठी पालक मेळावा घेऊन विषय मांडला. अंदाजे ३०,०००/- रूपये खर्च पाच हजार लीटर साठवण क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीसाठी अपेक्षित होता. शाळेतील शिक्षक प्रल्हाद सोनवणे व विलास जमदाडे या दोघांनीही ५,०००/- रूपये प्रत्येकी देणगी देण्याचे जाहीर केले. आवश्यक असलेली उर्वरित रक्कम ग्रामस्थांनी यथाशक्ती लोकवर्गणी काढून देण्याचे ठरले. 
गावातील अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या सखुबाई सिताराम घोडे या ५०-६० वर्षे वयाच्या महिलेला हा निरोप लागताच आपल्या स्वतःच्या दहा पंधरा पांड शेतात लावलेली तयार भाजी त्याच दिवशी काढली. बाजारात नेऊन मिळेल त्या भावात विकली.  आणि दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी दोनशे रुपयांची चिल्लर ओंजळीत घेऊन त्या शाळेत दाखल झाल्या. आणि मला म्हणाल्या, "गुरूजी, ही माझी वर्गणी." सखुबाई च्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात होते. मी त्यांना विनंती केली की तुमच्या घरच्या तेल, मीठ, मिरची साठी हे पैसे राहू द्या. तुम्ही कशाला पैसे देता. इतर ग्रामस्थ देतील ना. पण सखुबाईच्या आग्रहास्तव मला ते पैसे स्वीकारणे भाग पडले. ते पैसे  स्विकारताना माझ्या अंतर्मनाला खरोखरच पाझर फुटला होता. किती विश्वास ठेवतात ना ग्रामस्थ आपल्या शिक्षकांवर....!
     अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या अशोकराव घोडे, दिपक जाधव, कमल जाधव, सरस्वताबाई सुकटे, शोभा शेळके, द्रोपदा कडाळे अशा कितीतरी ग्रामस्थांच्या दातृत्वाचे आलेले अनुभव बघून आम्हाला काम करायला, पुरेपुर योगदान द्यायला प्रचंड उर्जा प्राप्त होत रहाते.
        गावाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काढलेल्या लोकवर्गणीतील शिल्लक रक्कम मोठ्या विश्वासाने शिक्षकांच्या हवाली करतात. गावातील प्राचीन मारूती मंदिर मोडकळीस आलेले असतानाही विद्येच्या या मंदिरासाठी भरभरून योगदान देणाऱ्या या दानशूर ग्रामस्थांपुढे आमचा माथा नम्रतेने नतमस्तक होतो.
    शे- सव्वाशे वर्षांपूर्वी संत गाडगेबाबा सांगून गेलेत....
       *खर्चू नका देवासाठी पैसा* |
*शिक्षणाला पैसा तोच द्या हो* ||
*शाळेहून नाही थोर ते मंदिर* |
*देणगी उदार शाळेला द्या* ||
 या उक्तीप्रमाणे गेल्या सहा- सात वर्षांत दहा- बारा लाखापेक्षा अधिक रकमेतून शाळेला मैदानाची जागा, मैदान सपाटीकरण, विद्यार्थ्यांना बघण्यासाठी लाकडी बाक, शालेय आवार रंगरंगोटी, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर, अभ्यासक्रम सॉफ्टवेअर, पिण्याच्या पाण्याची टाकी, स्टेज, म्युझिक सिस्टीम आदींसह अनेक कामे ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने मार्गी लागली आहेत. आणि म्हणूनच आमच्या शाळेचा नामोल्लेख *"गरीब ग्रामस्थांची, श्रीमंत शाळा"* असा अभिमानाने होतो आहे.
     शेवटी एवढच म्हणावेसे वाटते.....
*कसे व्हावे उतराई*
*गावाने केली नवलाई*
*शाळा म्हणजे आई*
*ऋण फेडण्यास*
*शब्द न उरले काही....*
*तुम्ही केलेली मदत नाही विसरणार कधी.....*
*आभार शब्दसरींनी भरूनी येणार*
*घोडेवाडी गावाचे नाव गर्जत राहणार.....*






मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

वनारवाडी शाळेत महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
*वनारवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन*

 वनारवाडी (ता.दिंडोरी):- येथील जिल्हा परिषद शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती प्रतिमा पूजनासह परिसर साफसफाई करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलाबराव ठाकरे हे होते.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षक व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी केले होते. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली.
 विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक विलास जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त करून महात्मा गांधींचा 'स्वावलंबन' हा गुण अंगिकारावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदा घोलप यांनी महात्मा गांधींची आवडती प्रार्थना 'रघुपती राघव राजाराम' व 'दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल' या गीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे सूञसंचालन भाऊसाहेब नांदूरकर यांनी तर आभार प्रदर्शन विलास जमदाडे यांनी केले.



फोटो:- महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी गुलाबराव ठाकरे, भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप आदींसह शालेय विद्यार्थी.

माझा शैक्षणिक बायोडाटा

 *_शैक्षणिक कार्य परिचय_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*नाव :-* _श्री. विलास शिवाजीराव जमदाडे._ 


_प्राथमिक शिक्षक_

*शाळा :-* _जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी, ता.- दिंडोरी, जि.- नाशिक._ 

*शैक्ष. पाञता -* _एम. ए._ 

*व्याव. पाञता -* _डी. एड._

*एकूण सेवा -* _१७ वर्षे २ महिने_

*शैक्षणिक कार्याचा परिचय :-* _श्री. विलास जमदाडे सर दिनांक- २९/०५ /२००७ पासून ते दिनांक- ३०/०५/२०१६ पर्यंत शेतात मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या घोडेवाडी, तालुका - दिंडोरी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते जि. प. प्राथमिक शाळा वनारवाडी, तालुका - दिंडोरी येथे दिनाक- ३१/०५/२०१८ पासून तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. घोडेवाडी व वनारवाडी या दोन्हीही शाळांमध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, बेटी बचाओ- बेटी पढाओ, बालआनंद मेळावा, शिक्षणमहोत्सव, शाळेचा वर्धापनदिन साजरा करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण, शाळेत रक्षाबंधन, गोपाळकाला, दिवाळी यासारखे सण, थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे करणे या सारखे अनेक उपक्रम राबवून १००% पटनोंदणी, दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो._

  _शाळेच्या आवारात लावलेल्या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून, सेंद्रिय खते टाकून वृक्षसंवर्धन करणाऱ्या श्री. जमदाडे सरांचा "मैञी पर्यावरणाशी" हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडून प्रसिद्ध होणाऱ्या जीवन शिक्षण या मासिकात जून २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे._

  _आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल मध्ये घोडेवाडी शाळेतील बारा विद्यार्थ्यांची जमदाडे सरांच्या मार्गदर्शनाने गुणवत्तेच्या आधारे निवड झाली असून त्यांचे पुढील मोफत शिक्षण चालू आहे._

    _पाच-सहाशे लोकवस्तीच्या या छोट्याशा गावांमध्ये ३० लाख रुपयांपेक्षा अधिक लोकसहभाग मिळवून शालेय वर्गखोली, अद्ययावत स्वच्छतागृह, शालेय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी लाकडी बाक, विद्यार्थ्यांच्या क्रीडा विषयक कलागुणांना वाव मिळण्यासाठी अस्वच्छ जागेचा कल्पकतेने वापर करून खेळाचे मैदान निर्मिती, लॅपटॉप, डिजिटल वर्ग खोली, साऊंड सिस्टीम, शालेय इमारतीला आकर्षक रंगरंगोटी, व्यासपीठ, पाच हजार लिटर क्षमता असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी आदी सोयीसुविधा निर्माण करण्यात जमदाडे सरांचा सिंहाचा वाटा आहे._

_जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हास्तरापर्यत जमदाडे सरांच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविलेले आहे. नाशिक जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत दिंडोरी तालुक्याला सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवूण देण्यात देखील जमदाडे सरांचे बहुमोल योगदान आहे._

          _दिनांक- २१ एप्रिल २०१७ रोजी संदिप फाऊंडेशन, नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत नाविन्यपूर्ण ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याचा स्टाॅल लावण्याची संधी त्यांना दिंडोरी तालुक्यातून मिळाली होती._

      _जोपूळ बीटाचे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी मान. आर. एन. निकम यांच्या संकल्पनेतून ४ सप्टेंबर २०१६ रोजी संपन्न झालेल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यिक तथा प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांच्या हस्ते "बीट स्तरीय गुणवंत शिक्षक" पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे._ 

   _सलग १२ वर्षे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात सहभाग घेऊन सातत्याने यश संपादन केले असून या कामगिरीची दखल घेऊन डिसेंबर २०१३ मध्ये तालुका स्तरीय "आदर्श विज्ञान शिक्षक" पुरस्कार जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षण सभापती ज्योतीताई माळी, आमदार धनराज महाले यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे._

    _मालेगाव येथील किनो शिक्षण संस्थेच्या वतीने विलास जमदाडे सरांना गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलेला आहे._

   _दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाने देखील महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीरामजी शेटे सो. यांच्या हस्ते व मविप्र समाज संस्थेचे संचालक आदरणीय दत्तात्रय पाटील सो. यांच्या उपस्थितीत दिनांक- ६ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरी वैभव पुरस्कार देऊन विलास जमदाडे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केलेला आहे._

    _तसेच दिनांक- ४ जानेवारी २०१६ रोजी दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक येथे संपन्न झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हा स्तरीय शिक्षक कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव मान. नंदकुमार साहेब यांच्या हस्ते जमदाडे सरांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले आहे._

_५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सन २०१९/२०२० चा नाशिक जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शितल सांगळे, शिक्षण सभापती यतीन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली झनकर मॅडम यांच्या हस्ते जमदाडे सर यांना प्रदान करण्यात आलेला आहे._
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻


विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...