इंग्रजी अल्फाबेट

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

वनारवाडी शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात

वनारवाडी शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात 
दिंडोरी तालुक्यातील जि. प. शाळा वनारवाडी ह्या शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. " शाळा बंद, पण शिक्षण सुरू " या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी ऑनलाईन व्हॉट्सअॅप ग्रुप, गल्ली मित्र व प्रत्यक्ष संवाद साधून पालक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने घरोघर फिरून अध्यापन करत आहेत. गावातील खंडेराव मंदिर परिसरात सोशल डिस्टन्स ठेवून भरविण्यात आलेल्या वर्गास उपसरपंच दत्तात्रय भेरे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्कर घोलप यांनी भेट घेऊन समाधान व्यक्त केले. गटशिक्षण अधिकारी बी. डी. कनोज, मोहाडी बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप, केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे यांच्या मार्गदर्शनान्वये जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे सामाजिक अंतर ठेवून, मास्क वापरुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे. तसेच शिक्षक घरोघर फिरून दिक्षा अँप व टेलिग्रामवरील तंत्रसेतू- नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल कसे हाताळावे याबाबत पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. खंडेराव मंदिर परिसरात पालकांच्या संमतीने उपस्थित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणींचे निरसन करून व्हॉट्स अँपवर दिलेला अभ्यास कसा करावा हे प्रात्याक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात येत आहे. तसेच मागील दिलेल्या अभ्यासाचा मागोवा घेण्यात येत आहे. याकामी भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप व सुनंदा अहिरे आदी शिक्षकांनी शाळा स्तरावर नियोजन करून आठवड्यातून किमान दोन दिवस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केलेले असून त्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नसल्याने शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातील पालक वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

१) खंडेराव मंदिर परिसरातील सभामंडपात भरलेल्या वर्गाला भेट देऊन मार्गदर्शन करतांना सरपंच दत्तात्रय भेरे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्कर घोलप, समवेत वर्गशिक्षक सुनंदा अहिरे, विलास जमदाडे व सोशल डिस्टन्स राखून बसलेले शालेय विद्यार्थी.

२) घरोघर फिरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच दिक्षा अँप व टेलिग्रामवरील तंत्रसेतू- नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल कसे हाताळावे यासंदर्भात पालकांचे उद्बोधन करताना शिक्षक विलास जमदाडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...