इंग्रजी अल्फाबेट

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

झूममिट वरील पहिली ऑनलाईन शिक्षण परिषद

💻📱💻📱💻📱💻📱
*_केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी_*
*_बीट- मोहाडी_*
_झूममिट वरील पहिली ऑनलाईन शिक्षण परिषद_ 
 
_आज मंगळवार, दिनांक- २८ जुलै २०२० रोजी दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत तब्बल चार तास नॉनस्टॉप ऑनलाईन शिक्षण परिषद न कंटाळता सुरू होती. आणि झूममिट फ्री व्हर्जनच्या नॉनस्टॉप चार तासातील सरासरी उपस्थिती ९५ % च्या पुढे होती हेही विशेषच..._
*_प्रमुख उपस्थिती_*
गटशिक्षण अधिकारी *_आदरणीय बी. डी. कनोज साहेब,_*
जेष्ठ अधिव्याख्याता *_आदरणीय डाॅ. बाबासाहेब बढे साहेब,_*
शिक्षण विस्तार अधिकारी *_आदरणीय एस. एस. घोलप मॅडम,_*
केंद्रप्रमुख *_आदरणीय एस. एन. कोठावदे साहेब_*
     ऑनलाईन शिक्षण परिषद नियोजनाची जबाबदारी पाड पाडत असताना झूममिट मध्ये ऑनलाईन व्हिडीओ रन होईल याची खात्री होती, परंतू ऑडिओ पोहोचेल की नाही याबाबत साशंकता मनात असल्याने बऱ्याच मोठ्या तणावात ऑनलाईन परिषदेला सुरूवात झाली, सर्व शिक्षक मिटिंग साठी जाॅईन झाल्यानंतर औपचारिक स्वागत आणि निवडक प्रशासकीय सूचना देण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख कोठावदे सरांनी लीलया पार पाडली, त्यानंतर स्क्रिन शेअरिंग करून मार्गदर्शक pdf ला अनुसरून माईक म्यूट करणे, रिनेम करणे यासंदर्भात सूचना करून शिक्षण परिषदेच्या मुख्य विषयाला सुरूवात झाली, आजपर्यंत झूम मिटिंग मोबाईलवरूनच अटेंड केलेली असल्याने मनात ऑडिओ सर्वांपर्यंत जाईल का याची घालमेल चालू होतीच. आणि ती वेळ आलीच...
   आदरणीय शिक्षणाधिकारी डाॅ.  वैशाली झनकर मॅडम यांचा सर्व शिक्षकांना उद्देशून मार्गदर्शक व्हिडीओ सुरू केला...,
   व्हिडीओ रन झाला आणि दहा सेकंदातच स्टाॅप करून *_व्हिडीओचा आवाज येतोय का...?_* अशी विचारणा केली, समोरून येणारे उत्तर ऐकण्यास कान आसुसलेले होते. 
आणि समोरून ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र धिवर सर यांचा आवाज आला...
*_येतोय सर..._*
आणि ऑनलाईन मिटिंग चालू असतानाच मनात प्रचंड आनंदाच्या उकळ्या फूटल्यात...
त्यानंतर तब्बल चार तास सचिन तेंडुलकर पेक्षा धुव्वाधार बॅटिंग केली. सोबत होती बीटातील शिक्षकाच्या उत्स्फूर्त सहभागाची...
त्यामुळे तब्बल चार तास होऊनही शिक्षण परिषदेचे घटक सोडून चर्चा कुठेही भरकटली नाही, शक्यतो ऑफलाईन शिक्षण परिषदेत कुठेही न आढळणारा वक्तशीरपणा ऑनलाईन कार्यशाळेत प्रकर्षाने पाळला गेला. गटशिक्षण अधिकारी, सर्व शिक्षकांचे प्रेरणास्थान आदरणीय बी. डी. कनोज साहेब यांचे सर्व विषयांना हात घालणारे मार्गदर्शन, ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय डाॅ. बाबासाहेब बढे साहेब यांची धावत्या शेड्यूल मधील एकदिड तासाची उपस्थिती, शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एस. एस. घोलप मॅडम यांनी मातेच्या ममतेप्रमाणे दिलेला आपुलकीचा मार्गदर्शक सल्ला आणि केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे सर यांनी वडीलकिच्या नात्याने दोन केंद्रांची जबाबदारी पेलून केलेले मार्गदर्शन यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिले पुष्प प्रेरक, मार्गदर्शक आणि नवी दृष्टी देणारे ठरले. खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_शब्दांकन_*
_विलास जमदाडे_
_जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी, केंद्र- तळेगाव दिं, तालुका- दिंडोरी._

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...