*दिंडोरी तालुक्यातील तब्बल दिड हजारांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी गिरवले ऑनलाईन तंत्रज्ञानाचे धडे*
*" शाळा बंद परंतू शिक्षण सुरू... "*
दिंडोरी(प्रतिनिधी):- कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील तब्बल दिड हजारांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यातील एकूण एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या वीस दिवसांपासून रोज चार तास या ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आल्यात. गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी एस. पी. पगार यांच्या सनियंत्रणात कार्यशाळेत राज्यस्तरीय तंञस्नेही सुलभक प्रकाश चव्हाण, दत्तात्रय चौगुले, विलास जमदाडे, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरूम, टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल, जिओ चॅट, एमससीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडीओ काॅलिंग, काॅन्फरन्स काॅलिंग यासंदर्भात ऑनलाईनरित्या प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यशाळांना दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप, एम. एस. कोष्टी, सी. बी. गवळी, एस. पी. पगार, के. पी. सोनार, एस. डी. अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, देवराम शार्दूल, परसराम चौरे, शरद कोठावदे, रामदास धाञक, दादासाहेब ठाकरे, चंद्रशेखर मोरे, मोतीराम पवार, किसन पवार, मीरा खोसे आदी केंद्रप्रमुख प्रशिक्षण यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
बाईट-
१) कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर "शाळा बंद, परंतु शिक्षण सुरू" या उपक्रमांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा घेऊन तंत्रज्ञानातील विविध बाबींची माहिती तालुक्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षणातून देण्यात आली. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात येत आहे.
- बी. डी. कनोज, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी
२) तंत्रज्ञानविषयक ज्ञानात भर घालणारी कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्यात. कॉन्फरन्स कॉलिंगपासून ते नुकतेच आलेल्या जिओ मिट पर्यंतची माहिती अतिशय सोप्या व सहज पद्धतीने प्रशिक्षक टिमकडून देण्यात आली. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होईल.
- एस. पी. पगार, प्रशिक्षण सनियंत्रक (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी)
{ कामिनी चारोस्कर, सभापती, पंचायत समिती दिंडोरी यांनीही ऑनलाईन कार्यशाळेत उपस्थित राहून सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले व ऑनलाईन कार्यशाळांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.}



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा