*शिक्षकांना दिले जाताय ऑनलाईन तंत्रज्ञानाचे धडे*
*" शाळा बंद परंतू शिक्षण सरू... "*
दिंडोरी:- कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकूण एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवसांपासून या ऑनलाईन कार्यशाळा संपन्न होत आहेत. गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी एस. पी. पगार यांच्या सनियंत्रणात कार्यशाळेत सुलभक म्हणून
ऑनलाईन कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंञस्नेही सुलभक प्रकाश चव्हाण, दत्तात्रय चौगुले, विलास जमदाडे, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरूम, टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल, जिओ चॅट, एमससीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडीओ काॅलिंग, काॅन्फरन्स काॅलिंग यासंदर्भात ऑनलाईन रित्या प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करीत आहेत.
प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा विद्या प्राधिकरण, नाशिकच्या प्राचार्या डाॅ. वैशाली झनकर, अधिव्याख्याता योगेश सोनवणे, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मिक चव्हाण, उर्मिला उशीर यांच्या मार्गदर्शनाखाली तंञस्नेही कार्यशाळा तालुकास्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यशाळेला दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप, एम. एस. कोष्टी, सी. बी. गवळी, एस. पी. पगार, के. पी. सोनार, एस. डी. अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, देवराम शार्दूल, परसराम चौरे, शरद कोठावदे, रामदास धाञक, दादासाहेब ठाकरे, चंद्रशेखर मोरे, मोतीराम पवार, किसन पवार, मीरा खोसे आदी केंद्रप्रमुख प्रशिक्षण यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
बाईट-
१) कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर "शाळा बंद, परंतु शिक्षण सुरू" या उपक्रमांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा घेऊन तंत्रज्ञानातील विविध बाबींची माहिती तालुक्यातील सर्वच शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षणातून देण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे.
- बी. डी. कनोज, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी
२) तंत्रज्ञानविषयक ज्ञानात भर घालणारी कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने अनुभवता आली. कॉन्फरन्स कॉलिंगपासून ते नुकतेच आलेल्या जिओ मिट पर्यंतची माहिती अतिशय सोप्या व सहज पद्धतीने प्रशिक्षक टिमकडून देण्यात आली. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होईल.
- सुनिल रमेश पेलमहाले, पदवीधर शिक्षक, जि. प. शाळा वाघाड
३) तंत्रस्नेही सुलभकांनी अतिशय सोप्या पद्धतीने तंत्रज्ञानातील अनेक नाविन्यपूर्ण बाबींची माहिती दिली. कोरोना काळात मी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या माध्यमांचा वापर करेन. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यादृष्टीने प्रयत्नशील राहील.
- कावेरी नामदेव भोये.
प्राथमिक शिक्षिका, जि. प. शाळा भनवड
फोटो :- दिंडोरी तालुकास्तरीय ऑनलाईन तंञस्नेही कार्यशाळेत सहभागी झालेले शिक्षक.