शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध- यश राठी
वनारवाडी शाळेत वर्गखोलीचे भूमिपूजन
दिंडोरी (प्रतिनिधी):- शाळांमध्येच राष्ट्राची भावी पिढी सुजाण व सक्षमपणे घडत असते म्हणून शिक्षण क्षेत्रात पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात एम्पायर स्पायसेस लि. कंपनी कटिबद्ध आहे असे उदगार संचालक यश राठी यांनी काढले. ते वनारवाडी शाळेतील वर्गखोली भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यापसंगी व्यासपीठावर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव, उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, उपसरपंच दत्तात्रय भेरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव, निलेश पाटील, एस. एन. कोठावदे, संतोष कथार सर, ग्रामसेविका आश्विनी पाटील आदींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे एम्पायर स्पायसेस लि. कंपनीच्या माध्यमातून वर्ग खोली बांधून देण्यात येणार असून त्या कामाचे भूमिपूजन कंपनीचे संचालक यश राठी, विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. याकामी उपसरपंच दत्तात्रय भेरे व प्राथ. शिक्षक विलास जमदाडे यांनी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
कार्यक्रम प्रसंगी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रत्येक वर्गातील दोन गरीब व होतकरू १० विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वतीने रेडिओचे वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच रूंजा ठाकरे, किसन वाघमारे, बंडूभाऊ भेरे, भास्कर घोलप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद भेरे, गुलाब ठाकरे, ग्रामसेविका आश्विनी पाटील, नाना नाईकवाडे, बाळू मिसाळ, राजाराम राऊत, विश्वास चव्हाण, दिलीप खाडे, बाळासाहेब जाधव, रवींद्र गुंबाडे, भास्कर वाघ, मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर, सुनंदा घोलप, सुनंदा अहिरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास जमदाडे यांनी केले.
फोटो- वनारवाडी शाळेतील वर्गखोली कामाचे भूमिपूजन करतांना एम्पायर स्पायसेस कंपनीचे यश राठी, विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव, उपसरपंच दत्तात्रय भेरे, निलेश पाटील, एस. एन. कोठावदे, संतोष कथार, विलास जमदाडे आदींसह ग्रामस्थ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा