इंग्रजी अल्फाबेट

बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
 https://zee24news.co.in/?p=12224
*👆Click Here👆*
_आपल्या हक्काचे लोकप्रिय,नि:पक्ष,निर्भीड व रोखठोक व्यासपीठ...._
*🔺ZEE 24 NEWS LIVE*
 ___________////______________
*डिजीटल युगाचे,नवे पर्व..!!!*
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
*दिंडोरी प्रतिनिधी/संतोष कथार*

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

💫 *_शिक्षण परिषद_* 💫_पुष्प- ४ थे_*_माहे- ऑक्टोबर_*

💫 *_शिक्षण परिषद_* 💫
_पुष्प- ४ थे_
*_माहे- ऑक्टोबर_*
_सहभागी बीट- मोहाडी_
_केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी_
_बुधवार, दिनांक- २८ ऑक्टोबर २०२०_
_वेळ- दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.३०_
*_प्रमुख उपस्थिती_*
🌹 _शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एस. एस. घोलप मॅडम_
🌹 _प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिकच्या अधिव्याख्याता आदरणीय डाॅ.  संगिता महाजन मॅडम_
🌹 _केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे साहेब_
🌹 _डायट नाशिकचे विषयतज्ज्ञ आदरणीय प्रदीप शिंदे सर_
🌹 _LEF नाशिकच्या स्वप्निल मॅडम_
🌹 _विशेष शिक्षिका वैशाली तरवारे मॅडम_

*_होस्ट-_* _विलास जमदाडे सर_

 _पूर्व नियोजनाप्रमाणे शार्प दुपारी ०१.४५ मिनिटांनी शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली, अवघ्या दहा मिनिटात उपस्थिती १०० पर्यंत जाऊन पोहोचली, केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे सर यांनी औपचारिक स्वागत करून शिक्षण परिषदेस सुरूवात करण्यात आली._

💫 *_तासिका- १_*
*_शिक्षण परिषद पूर्वतयारी व प्रस्तावना-_*
_होस्ट विलास जमदाडे सर, वनारवाडी यांनी झूम अॅपच्या वापरासंदर्भातील प्राथमिक सूचना दिल्या, शिक्षण परिषद सलग चौथ्यांदा ऑनलाईन घेण्यात आल्याने प्राथमिक सूचना दिल्यानंतर लगेचच अंमलबजावणी झाली. त्यानंतर जमदाडे सरांनी आजच्या शिक्षण परिषदेच्या संपूर्ण नियोजनाबाबत माहिती दिली._

*_प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिकच्या अधिव्याख्याता आदरणीय डाॅ. संगिता महाजन मॅडम यांनी सामाजिक व भावनिक आरोग्य याअंतर्गत स्वतःची बलस्थाने, त्रुटी/ कमतरता ओळखून स्व चा विकास कसा करावा ?, ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे ? यासंदर्भात अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून सर्व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले, कौतुक करायला शिका, आपण इतरांचे कौतुक केले तर त्याचे रिफ्लेक्शन नक्कीच सकारात्मक ठरते असा मौलिक सल्ला देऊन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नवोपक्रम स्पर्धेत जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले, तसेच डायटच्या सध्याच्या विविध उपक्रमासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले._*

💫 *_तासिका २ री_*
 *_मागील महिन्यातील मुद्द्यावर चर्चा / रिकॅप -_* 
_ज्येष्ठ शिक्षक धनंजय आहेर सर, तळेगाव दिं. यांनी मागील शिक्षण परिषदेतील विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली._

_प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिकचे माननीय प्राचार्य जालिंदर सावंत साहेब यांचा मार्गदर्शक व्हिडिओ दाखविण्यात आला._

💫 *_तासिका- ३_*
*_सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र-_*  _या विषयावर स्क्रिन शेअरिंग करून मंजुषा चौधरी मॅडम, अक्राळे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, बीटातील शिक्षकांची बलस्थाने चर्चेतून काढून घेत सर्वच शिक्षक बांधवांना चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घ्यायला भाग पाडले._

💫 *_तासिका- ४_*
*_मेराकी_* अंतर्गत डिजिटल पेरेंट मार्गदर्शन कार्यक्रमाबद्दल अभ्यासपूर्ण माहिती मनिषा पाटील मॅडम, पिंपळणारे व सुप्रिया धोंडगे मॅडम, जऊळके दिंडोरी यांनी दिली. तसेच त्यांनी मुलांच्या शैक्षणिक गरजा, पालकत्व आव्हाने, विविध जीवन कौशल्यां संदर्भात चर्चा घडवून आणली.

💫 *_तासिका- ५_*
*_नाशिक शिक्षण अधिकारी / शिक्षक व्यावसायिक विकास मंच-_* च्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा ज्येष्ठ शिक्षक शांताराम गुंजाळ सर, ढकांबे व योगेश बच्छाव सर, खडक सुकेणे यांनी आपल्या सादरीकरणातून घेतला.

*_प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिकचे विषयतज्ज्ञ आदरणीय प्रदीपजी शिंदे सर यांनी मोहाडी बीटाची शिक्षण परिषद नियोजनबद्ध रित्या सुरू असल्याबद्दल कौतुक करून, ऑनलाईन शैक्षणिक उपक्रमांतर्गत विविध बाबींबाबत चर्चेतून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले._*

💫 *_तासिका- ६_*
*_यशोगाथा_*
_कोरोना वाॅरियर च्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याविषयी उत्स्फूर्त चर्चा घडवून आणली. बीटातील शिक्षक भाऊसाहेब नांदूरकर सर, वनारवाडी व अश्विनी देशमुख मॅडम, हनुमाननगर यांनी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या शाळेतील विविध उपक्रमांची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली._

💫 *_तासिका- ७_*
*_डिजिटल टूल्स_*
_पंकज भारूडे सर, अक्राळे यांनी विविध डिजिटल अॅपचा वापर कसा करावा यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले तसेच MENTIMETER POLLING TOOL व BOOK CREATOR.COM यासंदर्भात परिपूर्ण माहिती दिली, याप्रसंगी उपस्थितांचा चर्चेतील सहभाग वाखाणण्याजोगा होता._

💫 *_तासिका- ८_*
*_प्रशासकीय कामकाज-_*
_आदरणीय सौ. एस. एस. घोलप मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी व आदरणीय श्री. एस. एन. कोठावदे सर, केंद्रप्रमुख यांनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बीटातील शाळा व शिक्षक यांचा नामोल्लेख करून कोवीड १९ पार्श्वभूमीवर शाळा बंद असतांनाही विविध माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षक बांधवाचे कौतुक केले व प्रशासकीय मार्गदर्शक सूचना दिल्या. ज्येष्ठ तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र धिवर सर यांनी देखील महत्त्वाच्या प्रशासकीय सूचना दिल्यात तर CWSN विद्यार्थ्यां संदर्भातील विविध योजना व त्यासंबंधातील प्रशासकीय मार्गदर्शन विशेष शिक्षिका वैशाली तरवारे मॅडम यांनी केले._

💫 *_तासिका- ९_*
*_आत्मचिंतन_*
_प्रकाश भामरे सर, तळेगाव दिं. यांनी आजच्या शिक्षण परिषदेतील विविध घटकांचा धावता आढावा घेऊन सारांश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला._

💫 *_तासिका- १०_*
*_आपले अभिप्राय, आभार व समारोप-_*
_जानोरी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रमोद शिरसाठ सरांनी फिडबॅक लिंक भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सर्व मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे विशेष कौतुक करून आभार मानलेत._

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
_मार्गदर्शक शिक्षकांसोबत शिवाजी वाघ सर, रमेश मोरे सर, चेतनकुमार घरटे सर, कल्याणी वाशिकर मॅडम, प्रमिला जाधव मॅडम, रूपाली कराड मॅडम, कल्पना गांगुर्डे मॅडम, प्रिया वरोडे मॅडम आदींसह बहुसंख्य शिक्षकांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन शिक्षण परिषद यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला._
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_शब्दांकन_*
_विलास जमदाडे सर_
_जि. प. प्राथ.  शाळा वनारवाडी,_
_केंद्र - तळेगाव दिंडोरी,_
_तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक_

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

*_कोरोनाशी..._* *_लढा शिक्षणाचा_*

*_कोरोनाशी..._*
 *_लढा शिक्षणाचा_*

आज कोरोना हे जागतिक संकट बनले आहे आणि या संकटाने सगळ्या जगात थैमान घातले आहे. याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद राहिलेले नाही. खरे पाहिले तर शिक्षण म्हटले की तो मिळविण्याचा प्रत्येक मुलाचा तो अधिकार आहे व प्रत्येक मूल स्वतंत्र असल्याने प्रत्येकाची शिकण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. पारंपारिक शिक्षण पद्धतीत सर्व मुलांना सारखे समजून एकाच पद्धतीने समूह शिक्षण देत आहे. परंतू कोरोनाच्या संकटाने आपल्याला या सामूहिक शिक्षणाच्या भिंती पाडून स्वतंत्र शिक्षण देण्याची व घेण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, तेव्हा या स्वायत्त विचारांचा प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उपयोग करून घ्यायला हवा. पारंपारिक शिक्षणाची चाकोरी तोडून शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आल्या परिस्थितीशी झुंजावे व यातून उचित मार्ग काढावा.
      कोरोना संकटाने शिक्षण व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत. अध्ययनाची गती बदलली आहे, वेळेचे परिणाम बदलले,अध्यापन कौशल्यामध्ये बदल झालाय. तेव्हा अशा प्रतिकूलतेला न घाबरता नवनिर्मितीची संधी म्हणून बघावे. या प्रतिकुलतेवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाशी मैत्री करून आपण आपले काम सुलभ बनवू शकतो. आज अनेक शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी झूम अँप, गुगल मिट, गूगल क्लासरूम या सारख्या अॅपचा वापर करून विद्यादानाचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या संपर्कात रहात आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही. शासन देखील आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करून देत आहे. शासनाचे हे प्रयत्न कितीही स्तुत्य असले तरीही त्याचा उपयोग हा केवळ आर्थिक सुबत्ता असलेल्या व मध्यमवर्गीय कुटुंबांनाच होतोय. स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा या समाजातील सर्वांकडेच उपलब्ध नाहीत. गरिब, कष्टकरी, भटके, आदिवासीबहुल अतिदुर्गम भागात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील असा धोका उत्पन्न झाला होता. आणि ज्या सधन भागांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत त्या भागात पालकांचा स्मार्ट फोनचा स्वतःपुरता वापर असणे, पालकांचे तंत्रज्ञानातील अज्ञान, फोन रिचार्ज नसणे, पालकांचे मोबाईल घेऊन कामावर जाणे, रेंज नसणे अशा अनेक अडचणी आहेतच. परंतू तरीही या सर्व समस्यांवर मात करीत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रेरणेतून, सहकार्यातून अनेक जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात शिक्षक म्हणून "विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे." याबाबतीत सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिक्षकच शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध नवनवीन बाबींचा परिचय करून देत सोबतीने समृद्ध होत आहेत. सरकारी व खाजगी शाळेतील शिक्षक शैक्षणिक व्हिडीओ, ऑनलाईन चाचण्या, तासिका, वेबिनार या माध्यमातून व ज्या मुलांच्या घरी स्मार्ट फोन नाही त्या मुलांना सुरक्षित अंतर ठेवून मंदिरासमोरील सभामंडप, अंगणात, ओट्यावर  बसवून ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत. ज्ञानाची ही गंगा श्रीमंतांच्या बंगल्याबरोबरच गरिबांच्या झोपडीपर्यंत अखंड वाहती ठेवण्याचा प्रयत्न सर्वच शिक्षक तनमनधनाने करतांना दिसून येत आहेत. 
   कोरोना काळातील शैक्षणिक संकटावर मात करण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ऑफलाईन शिक्षणाचा देखील पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी शिक्षक स्वतःच्याच कल्पकतेतून कृति पुस्तिका, स्वाध्याय पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना मोफत वितरीत करीत आहेत. त्याद्वारे विद्यार्थी स्वतः अभ्यास करू शकतात, अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष भेटीत, फोन काॅल, व्हिडीओ काॅल, काॅन्फरन्स काॅल द्वारे अभ्यासातील शंकांचे निरसन करवून घेऊ लागले आहेत. पाठ्यपुस्तकांचे वाचन करून पाठाखालील स्वाध्याय सोडवून तसेच आकाशवाणी, दूरदर्शनद्वारे आयोजित शैक्षणिक कार्यक्रम पाहून देखील विद्यार्थी अभ्यास करू शकतात त्याचबरोबर वरच्या वर्गात शिक्षण घेणारे मोठे भाऊ बहीण, गल्ली मित्र अथवा सुशिक्षित पालकांचे देखील मार्गदर्शन घेऊन आपली नवनवीन शैक्षणिक बाबी शिकण्याची भूक भागवू शकतात. 
     प्रत्येकाने आपल्या भूतकाळात डोकावून बघितले तर शाळेतील औपचारिक शिक्षणापेक्षा समाजाकडून, स्वतःच्याच अनुभवातून केलेले ज्ञान नक्कीच दिर्घकाल स्मरणात राहणारे असेल, शिकवलेल्या बाबींपेक्षा स्वतः शिकलेल्या बाबींची यादी नक्कीच मोठी होईल यात काहीच शंकाच नाही. स्वयं शिक्षणातून विद्यार्थी  सखोल विचार करायला शिकतील, समस्येच्या मुळाशी जायला शिकतील आणि यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो.
    कोरोना संकटात शाळा सुरू होतील की नाही ? किंवा शाळा केव्हा सुरू होतील हे सांगणे कठीण आहे. आजचा असलेला कोरोना उद्या नसेलच हेही खात्रीलायक सांगणे अवघड आहे. आणि शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, वर्गखोल्या सॅनिटाईज करणे आदी नियमांचे पालन विद्यार्थ्यांकडून केले  गेले पाहिजे. अद्यापपर्यंत तरी कोरोनावर प्रतिजैविके सापडलेली नाहीत त्यामुळेच जागतिक महामारीच्या या संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाय योजनेच आपल्या हातात आहे.
   शिक्षण हे ऑनलाईन असो की ऑफलाईन...ते निरंतन घेणे गरजेचे आहे. या नव्या जागतिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जातांना डिजीटल साक्षरता असणे, संगणक स्मार्ट फोन उपलब्ध असणे ही प्रमुख आव्हाने आहेतच मात्र नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणेच आपण फक्त संकटाकडे न बघता परिस्थिती समजून घेऊन तिच्याशी झुंज देणे व परिस्थितीवर स्वार होणेच गरजेचे आहे.

*श्री. विलास शिवाजीराव जमदाडे*
प्राथमिक शिक्षक, 
जि. प.  प्राथ.  शाळा वनारवाडी, तालुका- दिंडोरी
मोबाईल- ९८८१३०७५६३

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

वनारवाडी शाळेत वर्गखोलीचे भूमिपूजन

शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध- यश राठी
वनारवाडी शाळेत वर्गखोलीचे भूमिपूजन


दिंडोरी (प्रतिनिधी):- शाळांमध्येच राष्ट्राची भावी पिढी सुजाण व सक्षमपणे घडत असते म्हणून शिक्षण क्षेत्रात पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात एम्पायर स्पायसेस लि. कंपनी कटिबद्ध आहे असे उदगार संचालक यश राठी यांनी काढले. ते वनारवाडी शाळेतील वर्गखोली  भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यापसंगी व्यासपीठावर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव, उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, उपसरपंच दत्तात्रय भेरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
  विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव, निलेश पाटील, एस. एन. कोठावदे, संतोष कथार सर, ग्रामसेविका आश्विनी पाटील आदींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
      तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे एम्पायर स्पायसेस लि. कंपनीच्या माध्यमातून वर्ग खोली बांधून देण्यात येणार असून त्या कामाचे भूमिपूजन कंपनीचे संचालक यश राठी, विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. याकामी उपसरपंच दत्तात्रय भेरे व प्राथ. शिक्षक विलास जमदाडे यांनी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 
    कार्यक्रम प्रसंगी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रत्येक वर्गातील दोन गरीब व होतकरू १० विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वतीने रेडिओचे वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच रूंजा ठाकरे, किसन वाघमारे, बंडूभाऊ भेरे, भास्कर घोलप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद भेरे, गुलाब ठाकरे, ग्रामसेविका आश्विनी पाटील, नाना नाईकवाडे, बाळू मिसाळ, राजाराम राऊत, विश्वास चव्हाण, दिलीप खाडे, बाळासाहेब जाधव, रवींद्र गुंबाडे, भास्कर वाघ, मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर, सुनंदा घोलप, सुनंदा अहिरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास जमदाडे यांनी केले.

फोटो- वनारवाडी शाळेतील वर्गखोली कामाचे भूमिपूजन करतांना एम्पायर स्पायसेस कंपनीचे यश राठी, विवेक देशपांडे, ज्ञानेश्वर बच्छाव, उपसरपंच दत्तात्रय भेरे, निलेश पाटील, एस. एन. कोठावदे, संतोष कथार, विलास जमदाडे आदींसह ग्रामस्थ.

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

मोहाडी बीटाची झूम अॅप वरील ३ री ऑनलाईन शिक्षण परिषद, माहे- सप्टेंबर २०२०

*_शिक्षण परिषद_* 
_पुष्प- ३ रे_
*_माहे- सप्टेंबर २०२०_*
_सहभागी बीट- मोहाडी_
_केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी_
_मंगळवार, दिनांक- २९ सप्टेंबर २०२०_
_वेळ- दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.००_
*_प्रमुख उपस्थिती_*
🌹 _केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे साहेब_
🌹 _विशेष शिक्षिका- वैशाली तरवारे मॅडम_
*_होस्ट-_* _विलास जमदाडे सर_

 _पूर्व नियोजनाप्रमाणे शार्प दुपारी ०१.५० मिनिटांनी शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली, अवघ्या दहा मिनिटात उपस्थिती १०० पर्यंत जाऊन पोहोचली, केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे सर यांनी औपचारिक स्वागत केल्यानंतर शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली._
🌹 _निगडोळ शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कै. हिंडे सर यांचे आकस्मिक दुःखद निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली._


🌹 *_तासिका- १_*
*_शिक्षण परिषद पूर्वतयारी व प्रस्तावना-_*
_होस्ट विलास जमदाडे सर, वनारवाडी यांनी झूम अॅपच्या वापरासंदर्भातील प्राथमिक सूचना दिल्या, शिक्षण परिषद सलग तिसऱ्यांदा ऑनलाईन घेण्यात आल्याने प्राथमिक सूचना दिल्यानंतर लगेचच अंमलबजावणी झाली. त्यानंतर आजच्या शिक्षण परिषदेच्या संपूर्ण नियोजनाबाबत माहिती दिली._

🌹 *_मागील महिन्यातील मुद्द्यावर चर्चा-_* 
_ज्येष्ठ शिक्षक एन. जे. आहेर सर, खतवड यांनी मागील शिक्षण परिषदेतील विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली._

_नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय राजीवजी म्हसकर साहेब यांचा शिक्षकांना उद्देशून असलेला मार्गदर्शक व्हिडिओ दाखविण्यात आला._

🌹 *_तासिका- २_*
*_सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र_*  _या विषयावरील व्हिडिओ सादर करण्यात आला, त्यानंतर व्हिडिओतील सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र याविषयाला अनुसरून कल्पना गांगुर्डे मॅडम, पिंपळणारे व रत्ना भोसले मॅडम, वरवंडी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, याप्रसंगी अनेकांचा चर्चेतील सहभाग उत्स्फूर्त होता._


🌹 *_तासिका- ३_*
*_व्यावसायिक विकास मंच व DIKSHA UPDATE_* _तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र बेडसे सर, खतवड व पूनम झेंड मॅडम, मोहाडी यांनी व्यावसायिक विकास मंच यांच्यावतीने कोवीड काळातील विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा परिचय करुन दिला तसेच DIKSHA update संदर्भातील सखोल माहिती देऊन दिक्षा अॅपची उपयुक्तता यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले._

🌹 *_तासिका- ४_*
*_यशोगाथा_*
_गुणवंत शिक्षिका वृषाली पाटील मॅडम, खडक सुकेणे व उपक्रमशील शिक्षक सुरेश धूम सर, इंदोरे यांनी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोरोना वाॅरियर च्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याविषयी उत्स्फूर्त चर्चा घडवून आणली._

🌹 *_तासिका- ५_*
*_तांत्रिक सत्र-_* *_Right to read_*
_ज्येष्ठ पदवीधर शिक्षक शिवाजी वाघ सर, अक्राळे व महेश खैरनार सर, इंदिरानगर (जानोरी) यांनी Right to Read अॅपचा उपयोग, डाऊनलोड करण्याबाबत मार्गदर्शन यासंदर्भात चर्चा घडवून आणली, अस्खलित इंग्रजी ऐकण्याची संधी उपस्थितांना प्राप्त करून दिली, याप्रसंगी चर्चेतील सहभाग वाखाणण्याजोगा होता._

🌹 *_तासिका- ६_*
*_प्रशासकीय कामकाज-_*
_श्री. एस. एन. कोठावदे सर, केंद्रप्रमुख यांनी शाळांमध्ये सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल शिक्षक बांधवांचे नामोल्लेख घेऊन विशेष कौतुक केले. डोनेट अ डिव्हाईस या उपक्रमातील आपला सहभाग वाढवा असे आवाहन करून, कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर सध्याच्या गंभीर परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असा मार्गदर्शक सल्ला त्यांनी दिला._
_त्याचप्रमाणे श्री. राजेंद्रजी धिवर सर यांनी देखील महत्त्वपूर्ण प्रशासकीय सूचना दिल्यात._
_CWSN विद्यार्थ्यां संदर्भातील मार्गदर्शक सूचना व शिक्षक बांधवांच्या अडीअडचणी बाबत विशेष शिक्षिका वैशाली तरवारे मॅडम यांनी चर्चा घडवून आणत मार्गदर्शन केले._

🌹 *_तासिका- ७_*
*_आत्मचिंतन_*
_प्रभाकर नेरकर सर, शिवनई यांनी आजच्या शिक्षण परिषदेतील विविध घटकांचा धावता आढावा घेऊन सारांश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला._

🌹 *_तासिका- ८_*
*_आपले अभिप्राय, आभार व समारोप-_*
_मोहाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी सरांनी फिडबॅक लिंक भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सर्व मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे विशेष कौतुक करून आभार मानलेत._

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
_मार्गदर्शक शिक्षकांसोबत शिवाजी वाघ सर, रमेश मोरे सर, प्रमिला जाधव मॅडम, मंगला वाघ मॅडम, चेतनकुमार घरटे सर, मंजूषा चौधरी मॅडम आदींसह बहुसंख्य शिक्षकांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन शिक्षण परिषद यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला._
*_[ता. क. - झूम अॅपवर आयोजित केलेली ही ऑनलाईन शिक्षण परिषद कुठलाही व्यत्यय न येता सलग ४ तास नाॅनस्टाॅप सुरू होती.]_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_शब्दांकन_*
_विलास जमदाडे सर_
_जि. प. प्राथ.  शाळा वनारवाडी,_
_केंद्र - तळेगाव दिंडोरी,_
_तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक_

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

शिक्षण परिषद, पुष्प- २ रे, माहे- ऑगस्ट, सहभागी बीट- मोहाडी, केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी, शुक्रवार, दिनांक- २८ ऑगस्ट २०२०

शिक्षण परिषद
पुष्प- २ रे
माहे- ऑगस्ट
सहभागी बीट- मोहाडी
केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी
शुक्रवार, दिनांक- २८ ऑगस्ट २०२०
वेळ- दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.००
प्रमुख उपस्थिती
🌹 शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एस. एस. घोलप मॅडम
🌹 डायट नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय योगेश सोनवणे साहेब
🌹 केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे साहेब
🌹 डायट नाशिकचे विषयतज्ज्ञ आदरणीय प्रदीप शिंदे सर
🌹 LEF नाशिकचे मयुर सर आणि स्वप्निल सर
होस्ट- विलास जमदाडे सर

 पूर्व नियोजनाप्रमाणे शार्प दुपारी ०१.५० मिनिटांनी शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली, अवघ्या दहा मिनिटात उपस्थिती ९५ पर्यंत जाऊन पोहोचली, केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे सर यांनी औपचारिक स्वागत करून शिक्षण परिषदेस सुरूवात करण्यात आली.

🌹 तासिका- १
शिक्षण परिषद पूर्वतयारी व प्रस्तावना-
होस्ट विलास जमदाडे सर, वनारवाडी यांनी झूम अॅपच्या वापरासंदर्भातील प्राथमिक सूचना दिल्या, शिक्षण परिषद सलग दुसऱ्यांदा ऑनलाईन घेण्यात आल्याने प्राथमिक सूचना दिल्यानंतर लगेचच अंमलबजावणी झाली. त्यानंतर आजच्या शिक्षण परिषदेच्या संपूर्ण नियोजनाबाबत माहिती दिली.

🌹 मागील महिन्यातील मुद्द्यावर चर्चा-
चेतनकुमार घरटे सर, अक्राळे यांनी मागील शिक्षण परिषदेतील विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली.

नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय राजीवजी म्हसकर साहेब यांचा मार्गदर्शक व्हिडिओ दाखविण्यात आला.

🌹 तासिका- २
सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र 
या विषयावर स्क्रिन शेअरिंग करून प्रमिला जाधव मॅडम, पिंपळणारे व भारती जाधव मॅडम, मोहाडी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, अनेकांचा चर्चेतील सहभाग उत्स्फूर्त होता.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय योगेश सोनवणे साहेब यांनी सामाजिक व भावनिक आरोग्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच डायट च्या सध्याच्या विविध उपक्रमासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले.

🌹 तासिका- ३
तंत्रसेतू, DAD आणि रेडिओ प्रकल्पाची माहिती 
तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र धिवर सर, कुर्णोली यांनी टेलिग्राम अॅपवरील तंत्रसेतू नाशिक शिक्षण हेल्पलाईन या चॅनल विषयी माहिती देऊन अॅप डाऊनलोड कसे करावे, त्याच प्रमाणे  DAD आणि रेडिओ प्रकल्पाची माहिती दिली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिकचे विषयतज्ज्ञ आदरणीय प्रदीपजी शिंदे सर यांनी डोनेट डिव्हाईस, रेडिओ स्टेशन, ऑनलाईन शैक्षणिक उपक्रमांतर्गत विविध बाबींबाबत चर्चा करून जिल्हाभरातील विविध शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण यशोगाथा विशद करून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

🌹 तासिका- ४
यशोगाथा
रूपाली बोडके मॅडम, ढकांबे व मनिषा गायकवाड मॅडम, जानोरी यांनी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोरोना वाॅरियर च्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याविषयी उत्स्फूर्त चर्चा घडवून आणली.

🌹 तासिका- ५
तांत्रिक सत्र- इंग्लिश चर्चा सत्र
मधुकर दळवी सर, ढकांबे व प्रिया वरोडे मॅडम, जानोरी यांनी विविध अॅपच्या माध्यमातून इंग्रजीच्या विविध अध्यापन पद्धतींवर चर्चा घडवून आणली, अस्खलित इंग्रजी ऐकण्याची संधी उपस्थितांना प्राप्त करून दिली, चर्चेतील सहभाग वाखाणण्याजोगा होता.

🌹 तासिका- ६
प्रशासकीय कामकाज-
सौ. एस. एस. घोलप मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी व श्री. एस. एन. कोठावदे सर, केंद्रप्रमुख यांनी सर्व उपक्रमातील आपला सहभाग वाढवा असे आवाहन केले. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या हा आपुलकीचा सल्ला देत शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचे केलेले कौतुक नवी ऊर्जा देऊन गेले.

🌹 तासिका- ७
आत्मचिंतन
प्रभाकर नेरकर सर, शिवनई यांनी आजच्या शिक्षण परिषदेतील विविध घटकांचा धावता आढावा घेऊन सारांश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला.

🌹 तासिका- ८
आपले अभिप्राय, आभार व समारोप-
जानोरी शाळेचे मुख्याध्यापक गंगावणे सरांनी फिडबॅक लिंक भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सर्व मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे विशेष कौतुक करून आभार मानलेत.

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
मार्गदर्शक शिक्षकांसोबत शिवाजी वाघ सर, रमेश मोरे सर, प्रमोद शिरसाठ सर, धनंजय आहेर सर, राजेंद्रजी धिवर सर, मंगला वाघ मॅडम, मनीषा गायकवाड मॅडम, चेतनकुमार घरटे सर आदींसह बहुसंख्य शिक्षकांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन शिक्षण परिषद यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शब्दांकन
विलास जमदाडे सर
जि. प. प्राथ.  शाळा वनारवाडी,
केंद्र - तळेगाव दिंडोरी,
तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

#वनारवाडीच्या_विठ्ठल_मंदिर_परिसरात_आम्ही_बघितला_माणसातील_विठ्ठल...

#वनारवाडीच्या_विठ्ठल_मंदिर_परिसरात_आम्ही_बघितला_माणसातील_विठ्ठल...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
https://zee24news.co.in/?p=7773
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
मार्च पासून शाळा बंद असल्यातरी जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे गटागटात बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातोय. आज सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर रोजी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब नांदूरकर सर व विलास जमदाडे सर विठ्ठल मंदिर सभामंडपात सोशल डिस्टन्स ठेवून २५ ते ३० विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत होते. विद्यार्थांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करत होते. दोन तासांनंतर विद्यार्थांना सोडून देण्याची वेळ झाली आणि तेव्हढ्यात पावसाला सुरुवात झाली. अर्धा पाऊण तासात पाऊस उघडेल आणि विद्यार्थांना सोडून देऊ हा विचार मनात करत होतो, पण पावसाने जास्तच उग्र रूप धारण केल्याने विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात बसायलाच नव्हे तर उभे रहायला देखील जागा मिळेनाशी झाली. मुसळधार पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराच्या आवारातच आडोश्याला (कोवीड काळातील सोशल डिस्टन्सचा नियम नाईलाजाने पाळता येणे शक्य नसल्याने) आम्ही सर्वजण उभे राहिलो. एक तास होऊन गेला तरी पाऊस थांबण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. चोहोबाजूला फक्त आणि फक्त मुसळधार कोसळणारा पाऊसच...
     आम्ही आडोशाला उभे होतो त्याच विठ्ठल मंदिराच्या मागे थोड्या अंतरावर राहणारे एकनाथ भाऊ भेरे दोन रेनकोट, दोन-तीन छत्र्या घेऊन तेथे आले व धो धो कोसळणाऱ्या पावसात आम्हा दोघांना सर्व विद्यार्थ्यांसह घरी येण्याबाबत आग्रह करू लागले. मुसळधार पाऊस आणि सध्याच्या कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर घरी येण्यास आम्ही नकार दिला. परंतू एकनाथ भाऊंचा आग्रह आणि पाऊस थांबण्याची चिन्ह दिसेनात त्यामुळे त्याच्या घराकडे येण्याचे आम्ही मान्य केले. त्यानंतर एकनाथ भाऊंनी स्वतः एका वेळेस दोन तीन मुलांना अशा प्रकारे सर्व विद्यार्थी व आम्हा दोन शिक्षकांना पाच-सहा फेऱ्या मारून त्यांच्या घरी मुसळधार पावसात घेऊन गेले. चार- पाच तासांपासून घराबाहेर असल्याने अनेकांच्या पोटात कावळे ओरडत होते. एकनाथ भाऊंच्या घरी गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना भेरे कुटुंबियांनी भुईमुंगाच्या शेंगा खायला दिल्यात, त्यानंतर एवढ्या सगळ्या विद्यार्थांना पोहे बनवून पोटभर खाऊ घातले सोबतच पावसाच्या थंडगार वातावरणात चहाही पाजला. सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला. तीन साडेतीन तासांच्या अवधीनंतर पाऊस थांबला, भेरे कुटुंबीयांचे मनोमन आभार मानून सर्व विद्यार्थी आपापल्या घराकडे निघालेत. #देव_दगडात_नसून_माणसांत_असतो हा नवीन धडा गोरखभाऊ भेरे व एकनाथभाऊ भेरे या दोन बंधूंनी आपल्या आचरणातून आम्हां सर्वांनाच शिकवला.
   अडचणीच्या प्रसंगी देवदूता सारखे उभे राहून घरी आलेल्या आगंतुक अतिथींचा यथोचित पाहुणचार करणाऱ्या भेरे कुटुंबियांना जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी शाळेच्या वतीने मनापासून लाख लाख धन्यवाद...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शब्दांकन
विलास जमदाडे
प्राथ. शिक्षक
जि. प.  प्राथ. शाळा वनारवाडी,
तालुका - दिंडोरी, जिल्हा - नाशिक.
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 https://zee24news.co.in/?p=7773

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...