इंग्रजी अल्फाबेट

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

मोहाडी बीटाची झूम अॅप वरील ३ री ऑनलाईन शिक्षण परिषद, माहे- सप्टेंबर २०२०

*_शिक्षण परिषद_* 
_पुष्प- ३ रे_
*_माहे- सप्टेंबर २०२०_*
_सहभागी बीट- मोहाडी_
_केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी_
_मंगळवार, दिनांक- २९ सप्टेंबर २०२०_
_वेळ- दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.००_
*_प्रमुख उपस्थिती_*
🌹 _केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे साहेब_
🌹 _विशेष शिक्षिका- वैशाली तरवारे मॅडम_
*_होस्ट-_* _विलास जमदाडे सर_

 _पूर्व नियोजनाप्रमाणे शार्प दुपारी ०१.५० मिनिटांनी शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली, अवघ्या दहा मिनिटात उपस्थिती १०० पर्यंत जाऊन पोहोचली, केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे सर यांनी औपचारिक स्वागत केल्यानंतर शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली._
🌹 _निगडोळ शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कै. हिंडे सर यांचे आकस्मिक दुःखद निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली._


🌹 *_तासिका- १_*
*_शिक्षण परिषद पूर्वतयारी व प्रस्तावना-_*
_होस्ट विलास जमदाडे सर, वनारवाडी यांनी झूम अॅपच्या वापरासंदर्भातील प्राथमिक सूचना दिल्या, शिक्षण परिषद सलग तिसऱ्यांदा ऑनलाईन घेण्यात आल्याने प्राथमिक सूचना दिल्यानंतर लगेचच अंमलबजावणी झाली. त्यानंतर आजच्या शिक्षण परिषदेच्या संपूर्ण नियोजनाबाबत माहिती दिली._

🌹 *_मागील महिन्यातील मुद्द्यावर चर्चा-_* 
_ज्येष्ठ शिक्षक एन. जे. आहेर सर, खतवड यांनी मागील शिक्षण परिषदेतील विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली._

_नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय राजीवजी म्हसकर साहेब यांचा शिक्षकांना उद्देशून असलेला मार्गदर्शक व्हिडिओ दाखविण्यात आला._

🌹 *_तासिका- २_*
*_सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र_*  _या विषयावरील व्हिडिओ सादर करण्यात आला, त्यानंतर व्हिडिओतील सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र याविषयाला अनुसरून कल्पना गांगुर्डे मॅडम, पिंपळणारे व रत्ना भोसले मॅडम, वरवंडी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, याप्रसंगी अनेकांचा चर्चेतील सहभाग उत्स्फूर्त होता._


🌹 *_तासिका- ३_*
*_व्यावसायिक विकास मंच व DIKSHA UPDATE_* _तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र बेडसे सर, खतवड व पूनम झेंड मॅडम, मोहाडी यांनी व्यावसायिक विकास मंच यांच्यावतीने कोवीड काळातील विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा परिचय करुन दिला तसेच DIKSHA update संदर्भातील सखोल माहिती देऊन दिक्षा अॅपची उपयुक्तता यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले._

🌹 *_तासिका- ४_*
*_यशोगाथा_*
_गुणवंत शिक्षिका वृषाली पाटील मॅडम, खडक सुकेणे व उपक्रमशील शिक्षक सुरेश धूम सर, इंदोरे यांनी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोरोना वाॅरियर च्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याविषयी उत्स्फूर्त चर्चा घडवून आणली._

🌹 *_तासिका- ५_*
*_तांत्रिक सत्र-_* *_Right to read_*
_ज्येष्ठ पदवीधर शिक्षक शिवाजी वाघ सर, अक्राळे व महेश खैरनार सर, इंदिरानगर (जानोरी) यांनी Right to Read अॅपचा उपयोग, डाऊनलोड करण्याबाबत मार्गदर्शन यासंदर्भात चर्चा घडवून आणली, अस्खलित इंग्रजी ऐकण्याची संधी उपस्थितांना प्राप्त करून दिली, याप्रसंगी चर्चेतील सहभाग वाखाणण्याजोगा होता._

🌹 *_तासिका- ६_*
*_प्रशासकीय कामकाज-_*
_श्री. एस. एन. कोठावदे सर, केंद्रप्रमुख यांनी शाळांमध्ये सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल शिक्षक बांधवांचे नामोल्लेख घेऊन विशेष कौतुक केले. डोनेट अ डिव्हाईस या उपक्रमातील आपला सहभाग वाढवा असे आवाहन करून, कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर सध्याच्या गंभीर परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असा मार्गदर्शक सल्ला त्यांनी दिला._
_त्याचप्रमाणे श्री. राजेंद्रजी धिवर सर यांनी देखील महत्त्वपूर्ण प्रशासकीय सूचना दिल्यात._
_CWSN विद्यार्थ्यां संदर्भातील मार्गदर्शक सूचना व शिक्षक बांधवांच्या अडीअडचणी बाबत विशेष शिक्षिका वैशाली तरवारे मॅडम यांनी चर्चा घडवून आणत मार्गदर्शन केले._

🌹 *_तासिका- ७_*
*_आत्मचिंतन_*
_प्रभाकर नेरकर सर, शिवनई यांनी आजच्या शिक्षण परिषदेतील विविध घटकांचा धावता आढावा घेऊन सारांश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला._

🌹 *_तासिका- ८_*
*_आपले अभिप्राय, आभार व समारोप-_*
_मोहाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी सरांनी फिडबॅक लिंक भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सर्व मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे विशेष कौतुक करून आभार मानलेत._

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
_मार्गदर्शक शिक्षकांसोबत शिवाजी वाघ सर, रमेश मोरे सर, प्रमिला जाधव मॅडम, मंगला वाघ मॅडम, चेतनकुमार घरटे सर, मंजूषा चौधरी मॅडम आदींसह बहुसंख्य शिक्षकांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन शिक्षण परिषद यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला._
*_[ता. क. - झूम अॅपवर आयोजित केलेली ही ऑनलाईन शिक्षण परिषद कुठलाही व्यत्यय न येता सलग ४ तास नाॅनस्टाॅप सुरू होती.]_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_शब्दांकन_*
_विलास जमदाडे सर_
_जि. प. प्राथ.  शाळा वनारवाडी,_
_केंद्र - तळेगाव दिंडोरी,_
_तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक_

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

शिक्षण परिषद, पुष्प- २ रे, माहे- ऑगस्ट, सहभागी बीट- मोहाडी, केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी, शुक्रवार, दिनांक- २८ ऑगस्ट २०२०

शिक्षण परिषद
पुष्प- २ रे
माहे- ऑगस्ट
सहभागी बीट- मोहाडी
केंद्र- तळेगाव दिं. व जानोरी
शुक्रवार, दिनांक- २८ ऑगस्ट २०२०
वेळ- दुपारी ०२.०० ते सायंकाळी ०६.००
प्रमुख उपस्थिती
🌹 शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एस. एस. घोलप मॅडम
🌹 डायट नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय योगेश सोनवणे साहेब
🌹 केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे साहेब
🌹 डायट नाशिकचे विषयतज्ज्ञ आदरणीय प्रदीप शिंदे सर
🌹 LEF नाशिकचे मयुर सर आणि स्वप्निल सर
होस्ट- विलास जमदाडे सर

 पूर्व नियोजनाप्रमाणे शार्प दुपारी ०१.५० मिनिटांनी शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली, अवघ्या दहा मिनिटात उपस्थिती ९५ पर्यंत जाऊन पोहोचली, केंद्रप्रमुख आदरणीय एस. एन. कोठावदे सर यांनी औपचारिक स्वागत करून शिक्षण परिषदेस सुरूवात करण्यात आली.

🌹 तासिका- १
शिक्षण परिषद पूर्वतयारी व प्रस्तावना-
होस्ट विलास जमदाडे सर, वनारवाडी यांनी झूम अॅपच्या वापरासंदर्भातील प्राथमिक सूचना दिल्या, शिक्षण परिषद सलग दुसऱ्यांदा ऑनलाईन घेण्यात आल्याने प्राथमिक सूचना दिल्यानंतर लगेचच अंमलबजावणी झाली. त्यानंतर आजच्या शिक्षण परिषदेच्या संपूर्ण नियोजनाबाबत माहिती दिली.

🌹 मागील महिन्यातील मुद्द्यावर चर्चा-
चेतनकुमार घरटे सर, अक्राळे यांनी मागील शिक्षण परिषदेतील विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली.

नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय राजीवजी म्हसकर साहेब यांचा मार्गदर्शक व्हिडिओ दाखविण्यात आला.

🌹 तासिका- २
सामाजिक व भावनिक आरोग्य सत्र 
या विषयावर स्क्रिन शेअरिंग करून प्रमिला जाधव मॅडम, पिंपळणारे व भारती जाधव मॅडम, मोहाडी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, अनेकांचा चर्चेतील सहभाग उत्स्फूर्त होता.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय योगेश सोनवणे साहेब यांनी सामाजिक व भावनिक आरोग्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच डायट च्या सध्याच्या विविध उपक्रमासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले.

🌹 तासिका- ३
तंत्रसेतू, DAD आणि रेडिओ प्रकल्पाची माहिती 
तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र धिवर सर, कुर्णोली यांनी टेलिग्राम अॅपवरील तंत्रसेतू नाशिक शिक्षण हेल्पलाईन या चॅनल विषयी माहिती देऊन अॅप डाऊनलोड कसे करावे, त्याच प्रमाणे  DAD आणि रेडिओ प्रकल्पाची माहिती दिली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिकचे विषयतज्ज्ञ आदरणीय प्रदीपजी शिंदे सर यांनी डोनेट डिव्हाईस, रेडिओ स्टेशन, ऑनलाईन शैक्षणिक उपक्रमांतर्गत विविध बाबींबाबत चर्चा करून जिल्हाभरातील विविध शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण यशोगाथा विशद करून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

🌹 तासिका- ४
यशोगाथा
रूपाली बोडके मॅडम, ढकांबे व मनिषा गायकवाड मॅडम, जानोरी यांनी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोरोना वाॅरियर च्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याविषयी उत्स्फूर्त चर्चा घडवून आणली.

🌹 तासिका- ५
तांत्रिक सत्र- इंग्लिश चर्चा सत्र
मधुकर दळवी सर, ढकांबे व प्रिया वरोडे मॅडम, जानोरी यांनी विविध अॅपच्या माध्यमातून इंग्रजीच्या विविध अध्यापन पद्धतींवर चर्चा घडवून आणली, अस्खलित इंग्रजी ऐकण्याची संधी उपस्थितांना प्राप्त करून दिली, चर्चेतील सहभाग वाखाणण्याजोगा होता.

🌹 तासिका- ६
प्रशासकीय कामकाज-
सौ. एस. एस. घोलप मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी व श्री. एस. एन. कोठावदे सर, केंद्रप्रमुख यांनी सर्व उपक्रमातील आपला सहभाग वाढवा असे आवाहन केले. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या हा आपुलकीचा सल्ला देत शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचे केलेले कौतुक नवी ऊर्जा देऊन गेले.

🌹 तासिका- ७
आत्मचिंतन
प्रभाकर नेरकर सर, शिवनई यांनी आजच्या शिक्षण परिषदेतील विविध घटकांचा धावता आढावा घेऊन सारांश आपल्या ओघवत्या शैलीत मांडला.

🌹 तासिका- ८
आपले अभिप्राय, आभार व समारोप-
जानोरी शाळेचे मुख्याध्यापक गंगावणे सरांनी फिडबॅक लिंक भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सर्व मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे विशेष कौतुक करून आभार मानलेत.

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
मार्गदर्शक शिक्षकांसोबत शिवाजी वाघ सर, रमेश मोरे सर, प्रमोद शिरसाठ सर, धनंजय आहेर सर, राजेंद्रजी धिवर सर, मंगला वाघ मॅडम, मनीषा गायकवाड मॅडम, चेतनकुमार घरटे सर आदींसह बहुसंख्य शिक्षकांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन शिक्षण परिषद यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शब्दांकन
विलास जमदाडे सर
जि. प. प्राथ.  शाळा वनारवाडी,
केंद्र - तळेगाव दिंडोरी,
तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

#वनारवाडीच्या_विठ्ठल_मंदिर_परिसरात_आम्ही_बघितला_माणसातील_विठ्ठल...

#वनारवाडीच्या_विठ्ठल_मंदिर_परिसरात_आम्ही_बघितला_माणसातील_विठ्ठल...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
https://zee24news.co.in/?p=7773
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
मार्च पासून शाळा बंद असल्यातरी जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी येथे गटागटात बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातोय. आज सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर रोजी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब नांदूरकर सर व विलास जमदाडे सर विठ्ठल मंदिर सभामंडपात सोशल डिस्टन्स ठेवून २५ ते ३० विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत होते. विद्यार्थांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करत होते. दोन तासांनंतर विद्यार्थांना सोडून देण्याची वेळ झाली आणि तेव्हढ्यात पावसाला सुरुवात झाली. अर्धा पाऊण तासात पाऊस उघडेल आणि विद्यार्थांना सोडून देऊ हा विचार मनात करत होतो, पण पावसाने जास्तच उग्र रूप धारण केल्याने विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात बसायलाच नव्हे तर उभे रहायला देखील जागा मिळेनाशी झाली. मुसळधार पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराच्या आवारातच आडोश्याला (कोवीड काळातील सोशल डिस्टन्सचा नियम नाईलाजाने पाळता येणे शक्य नसल्याने) आम्ही सर्वजण उभे राहिलो. एक तास होऊन गेला तरी पाऊस थांबण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. चोहोबाजूला फक्त आणि फक्त मुसळधार कोसळणारा पाऊसच...
     आम्ही आडोशाला उभे होतो त्याच विठ्ठल मंदिराच्या मागे थोड्या अंतरावर राहणारे एकनाथ भाऊ भेरे दोन रेनकोट, दोन-तीन छत्र्या घेऊन तेथे आले व धो धो कोसळणाऱ्या पावसात आम्हा दोघांना सर्व विद्यार्थ्यांसह घरी येण्याबाबत आग्रह करू लागले. मुसळधार पाऊस आणि सध्याच्या कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर घरी येण्यास आम्ही नकार दिला. परंतू एकनाथ भाऊंचा आग्रह आणि पाऊस थांबण्याची चिन्ह दिसेनात त्यामुळे त्याच्या घराकडे येण्याचे आम्ही मान्य केले. त्यानंतर एकनाथ भाऊंनी स्वतः एका वेळेस दोन तीन मुलांना अशा प्रकारे सर्व विद्यार्थी व आम्हा दोन शिक्षकांना पाच-सहा फेऱ्या मारून त्यांच्या घरी मुसळधार पावसात घेऊन गेले. चार- पाच तासांपासून घराबाहेर असल्याने अनेकांच्या पोटात कावळे ओरडत होते. एकनाथ भाऊंच्या घरी गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना भेरे कुटुंबियांनी भुईमुंगाच्या शेंगा खायला दिल्यात, त्यानंतर एवढ्या सगळ्या विद्यार्थांना पोहे बनवून पोटभर खाऊ घातले सोबतच पावसाच्या थंडगार वातावरणात चहाही पाजला. सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला. तीन साडेतीन तासांच्या अवधीनंतर पाऊस थांबला, भेरे कुटुंबीयांचे मनोमन आभार मानून सर्व विद्यार्थी आपापल्या घराकडे निघालेत. #देव_दगडात_नसून_माणसांत_असतो हा नवीन धडा गोरखभाऊ भेरे व एकनाथभाऊ भेरे या दोन बंधूंनी आपल्या आचरणातून आम्हां सर्वांनाच शिकवला.
   अडचणीच्या प्रसंगी देवदूता सारखे उभे राहून घरी आलेल्या आगंतुक अतिथींचा यथोचित पाहुणचार करणाऱ्या भेरे कुटुंबियांना जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी शाळेच्या वतीने मनापासून लाख लाख धन्यवाद...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शब्दांकन
विलास जमदाडे
प्राथ. शिक्षक
जि. प.  प्राथ. शाळा वनारवाडी,
तालुका - दिंडोरी, जिल्हा - नाशिक.
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 https://zee24news.co.in/?p=7773

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

झोपाळा गेला उडून, इयत्ता १ ली, विषय- बालभारती

झोपाळा गेला उडून,
इयत्ता १ ली,
विषय- बालभारती
संकलन व निर्मिती-
श्री. व्ही. एस. जमदाडे
प्राथमिक शिक्षक,
जि. प. प्राथ. शाळा वनारवाडी,
तालुका- दिंडोरी, जिल्हा- नाशिक.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/sf3EIUjH9dc

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

 

इयत्ता १ ली व इयत्ता २ री च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

मराठी माध्यमातील

 १ ते १०० पर्यंत अंकी व अक्षरी उजळणी

व्हिडीओ बघण्यासाठी लिंकला क्लिक करा.

👇👇👇👇👇👇 

https://youtu.be/udX-_WcC5mI

 


 

 

 A To Z Alphabets With Attractive Pictures

इयत्ता १ ली व इयत्ता २ री च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 

https://youtu.be/t8FN8X-L8us





गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान अतिंथींना आमंत्रित करून शाळेतील सर्व शिक्षकांचा वनारवाडी ग्रामस्थांनी शिक्षक दिनानिमित्त केेला विशेष सन्मान

शिक्षक दिन कार्यक्रमाची व्हिडिओ न्यूज
*_शिक्षक दिनानिमित्त वनारवाडी ग्रामपंचायतीने केला जि. प. शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान_*
_मन हेलावून टाकणारा दिमाखदार सोहळा_
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
*_प्रमुख अतिथी_*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*_मान. कल्पेशकुमार चव्हाण साहेब,_* पोलीस उपनिरीक्षक, दिंडोरी
*_मान. निलेश पाटील,_*  उपशिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक
*_मान. संतोष कथार सर,_* अध्यक्ष, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघ 
*_मान. दत्तात्रय भेरे,_* उपसरपंच 
*_मान. बंडूभाऊ भेरे,_* ज्येष्ठ व्यावसायिक, 
*_मान. भास्कर घोलप,_* माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती
*_मान. शरद भेरे,_* 
अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, 
*_सौ. आश्विनी पाटील मॅडम,_* ग्रामसेविका
सर्व सन्मानिय सदस्य ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_शिक्षक दिनानिमित्त ग्रामपंचायत आवारात प्रमुख अतिथी च्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले._*

*_कार्यक्रमाची प्रमुख क्षणचित्रे_*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

इयत्ता १ ली, अभ्यासमाला, विषय- गणित

अभ्यासमाला डाऊनलोड करण्यासाठी लिंक
इयत्ता १ ली, अभ्यासमाला, विषय- गणित 


जून ते सप्टेंबरच्या अभ्यासक्रमावर आधारित...👍
१ ते ९ अंकांचे दृढीकरण होण्यास उपयुक्त, विद्यार्थांना आनंद वाटेल अशाप्रकारची आकर्षक निर्मिती.

भरपूर चित्रांचा वापर केल्याने अभ्यासमाला मनोरंजक ठरेल.

इयत्ता १ ली, अभ्यासमाला, विषय- मराठी

अभ्यासमाला डाऊनलोड करण्यासाठी लिंक इयत्ता १ ली, अभ्यासमाला, विषय- मराठी (बालभारती)

जून, जुलैच्या अभ्यासक्रमावर आधारित...👍
विद्यार्थांना आनंद वाटेल अशाप्रकारची आकर्षक निर्मिती.
भरपूर चित्रांचा वापर केल्याने अभ्यासमाला मनोरंजक ठरेल.

विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

*⚡विलास जमदाडे यांना शिवसेनेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*  https://zee24news.co.in/?p=12224 *👆Click Here👆* _आपल...